क्राईम न्यूज

सासवड पोलिसांची काळ्या काचा विरोधात धडक कारवाई; 22 वाहनावर कारवाई करत 37 हजार 500 रुपयांचा दंड वसूल


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
सासवड पोलिसांची काळ्या काचांविरोधात धडक कारवाई; २२ वाहनांवर कारवाई, ३७,५०० रुपयांचा दंड वसूल

सासवड : सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली. नाकाबंदी दरम्यान विशेषतः थार कंपनीच्या वाहनांवरील नियमबाह्य काळ्या काचा तपासून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान एकूण २२ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, संबंधित वाहनचालकांकडून ३७,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

वाहनांच्या काचांवर नियमबाह्य पद्धतीने काळी फिल्म अथवा काळ्या काचा लावल्यामुळे वाहनाच्या आतील भागाचे दृश्य अस्पष्ट होते. त्यामुळे वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा वाहनांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.
सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वरील कारवाई प्रभारी वरिष्ठ निरीक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस हवालदार कांबळे, पोलीस अंमलदार बापू म्हेत्रे, महिला पोलीस अंमलदार जगताप आणि कारंडे यांच्या वतीने करण्यात आली, या मोहिमेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे असेच कारवाई करावी असे अनेक लोकांनी सांगितले.
एकूण कारवाई : २२ केसेस
वसूल केलेला दंड : ₹३७,५००/-


Translate »
error: Content is protected !!