आस्करवाडीत “द फॉरेस्ट हॉटेलवर” सासवड पोलिसांची कारवाई ; बेकायदेशीर हुक्का बारचा पर्दाफाश 52500 रुपयांचा मुद्देमाल जप्त तीन जणांच्या वर कोप्ता कायद्यानुसार तीन जनावर गुन्हा दाखल!
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे:
आस्करवाडी ‘द फॉरेस्ट हॉटेल’वर पोलिसांची कारवाई; बेकायदेशीर हुक्का बारचा पर्दाफाश
५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, तीन जणांवर कोप्टा कायद्यानुसार गुन्हा दाखल
पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी येथील द फॉरेस्ट हॉटेलमध्ये बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या हुक्का बारवर सासवड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत हुक्का साहित्य व तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन जणांविरोधात कोप्टा अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. ४१५/२०२६ नुसार सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने महाराष्ट्र सुधारणा अधिनियम २०१८ चे कलम ४ अ, २१ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी अक्षय शंकर चिले (वय ३२, पोलीस शिपाई/३०३५, सासवड पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज हेमंतकुमार अहिरवार (वय २४), भुपेंद्र जसवंतकुमार (वय २६) आणि संतकुमार किशोरी खंगार (वय २२) हे तिघे जण द फॉरेस्ट हॉटेलमध्ये ग्राहकांना धूम्रपानासाठी अवैधरित्या हुक्का पुरवून हुक्का बार चालवत असल्याचे आढळून आले.
कारवाईमध्ये पोलिसांनी
४० हजार रुपये किमतीचे १० हुक्का पॉट १० हजार रुपये किमतीचे तंबाखूजन्य फ्लेवरचे ४ डबे,५०० रुपये किमतीच्या १० चिलीम,१०० रुपयांचे फिल्टर पाईप पॅकेट,१५०० रुपयांचे १० रबरी पाईप,४०० रुपयांच्या लोखंडी चाळण्या
असा एकूण ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई सासवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मा. संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत, पोलीस कॉन्स्टेबल तुषार लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय चिले,पोलीस कॉन्स्टेबल सचिन किवळे यांनी सहभाग घेतला.गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार हाके (१९७४) करत असून दाखल अंमलदार म्हणून पोलीस नाईक चव्हाण (१७०३) यांनी काम पाहिले.
सासवड पोलिसांच्या कारवाईमुळे हुक्का बार चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.






