क्राईम न्यूज

सासवड पोलिसांची बोपगावात गावात अवैध दारू विक्रीवर कारवाई :


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
सासवड पोलिसांची बोपगावात अवैध दारूविक्रीवर कारवाई

26 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सासवड-कोंढवा रोडवरील बोपगाव हद्दीत, हॉटेल महाकालच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये अवैध दारूविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सासवड पोलिसांनी कारवाई केली.

या कारवाईत चेतन राजेंद्र फडतरे (वय 30, रा. बोपगाव, ता. पुरंदर, जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून देशी दारू टॅगो पंचच्या 90 मिलीच्या 25 बाटल्या आणि मॅकडॉवेल नं. 1 व्हिस्कीच्या 180 मिलीच्या 3 बाटल्या, असा एकूण 1,630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

फडतरे हा देशी-विदेशी दारू जवळ बाळगून ओळखीच्या व्यक्तींना विक्री करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (ई) अन्वये सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार विनायक हाके करीत असून, प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.


Translate »
error: Content is protected !!