साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
सासवड – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन
सासवड शहरातील शिवतीर्थ चौक येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समाजबांधव, नागरिक आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आपल्या साहित्य, शाहिरी आणि प्रखर सामाजिक विचारांद्वारे त्यांनी वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाला हक्काचा आवाज दिला. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपल्या ओजस्वी शाहिरीतून जनजागृती करत महाराष्ट्राच्या अस्मितेला बळकटी दिल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचा त्यांचा विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सर्वसमावेशक विकासासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
याप्रसंगी भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष शेखरजी वढणे, पुणे जिल्हा सरचिटणीस गंगारामदादा जगदाळे, सासवड शहराध्यक्ष आनंद संजय जगताप, जिल्हा उपाध्यक्ष साकेत जगताप, हनुमंत साळुंखे, राजेंद्र धोत्रे, शिवाजी साळुंखे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






