ब्रेकिंग न्यूज

सह्याद्री माझा च्या बातमीचा इफेक्ट ; पुरंदर मधील सिताफळ रबडी उद्योग पुन्हा जोमाने सुरू होणार.


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
पुरंदरमध्ये रबडी उद्योग पुन्हा सुरू; बातमीचा मोठा परिणाम, सीताफळ बाजारात सुधारणा!

पुरंदर: सह्याद्री माझा बातमीची दखल घेत तालुक्यातील बंद पडलेले रबडी उद्योग पुन्हा सुरू झाले असून, याचा थेट सकारात्मक परिणाम सीताफळ बाजारभावावर दिसून येत आहे. रबडी उद्योग बंद असल्याने आणि एफडीए (FDA) च्या कारवाईमुळे गेल्या अनेक दिवसांपासून सीताफळाच्या दरात मोठी घसरण झाली होती.

मात्र, सह्याद्री माझा ने या समस्येवर प्रकाश टाकल्यानंतर तालुक्यातील रबडी व्यावसायिक आणि फळ प्रक्रिया उद्योजकांनी तातडीने याची दखल घेतली. सासवड (पुरंदर) फळ बाजारात शेतकऱ्यांना ‘फ्लाय ट्रॅप’चे (सापळे) वाटप करण्यात आले असून, सीताफळाच्या खरेदीला पुन्हा वेग आला आहे. सध्या बाजारात चांगल्या दर्जाच्या सीताफळाला १५०० ते २००० रुपये, तर मध्यम प्रतीच्या मालाला ७०० ते ८०० रुपयांचा समाधानकारक भाव मिळत आहे. बाजारातील या सुधारणेमुळे शिवरी येथील शेतकरी नवनाथ गायकवाड यांच्यासह सर्वच सीताफळ उत्पादकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या वेळी गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर यांच्यासह फळ प्रक्रिया उद्योजक नितिन इंगळे, नाना पाटील, सुशील झेंडे, राजू पोरे, बापू शेलार, नाथा कामथे, मनोज ढूमे, उमेश झेंडे, देवराम काळे, रामदास काळे, अजय जाधव आणि राजेंद्र पोमण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


Translate »
error: Content is protected !!