राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेचा पुरंदर वासियांकून जाहीर निषेध, शिवशाहीर यांच्या पोवाड्यांनी दिली छत्रपतींना मानवंदना
राजकोट येथील दुर्घटनेचा पुरंदर येथे निषेध ! शिव – शाहीरांच्या पवाड्यांनी छत्रपतींना मानवंदना,
सासवड : अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत,
छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोकणातील मालवण येथील राजकोट मध्ये कोसळला त्या दुःखद घटनेचा सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे, शिवतिर्थावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर पुरंदर तालुक्यातील तमाम
शिवप्रेमींनी सदर घटनेचा निषेध केला, यावेळी शिव- शाहीरांच्या पवाड्याने उपस्थित समूदायाच्या वतीने, छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवरायांचा जयजयकार करीत मानवंदना देण्यात आली, यावेळी, शिवसेना उबाटा गटाचे पुरंदर तालुका प्रमुख अभिजित जगताप, काॅंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदिप पोमण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष
माणिकराव झेंडे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, विजयराव कोलते सुदामराव इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष बंडूकाका जगताप , सासवड शहर अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णूदादा भोसले, बहूजन हक्क परिषदेचे
संस्थापक अध्यक्ष सुनिलतात्या धिवार, आप’चे नेते दत्तात्रय कड, काॅंग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनिताकाकी कोलते, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड पारधी आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार, सुहास बेंगाळे बहुजन सामाजिक विकास प्रतिष्ठानचे खजिनदार सुनिल जगताप, पप्पू ढगारे, सय्यद सर, सेवानिवृत्त
मुख्याध्यापक रामदास जगताप, सासवड शहर शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र जगताप, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष गुलाबराव गायकवाड रफीक भाई शेख काॅंग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष मोमीन बागवान, यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते,
यावेळी उबाटा शिवसेनेचे तालुका प्रमुख अभिजित जगताप यांनी, मालवन येथील छत्रपती शिवयायांचा पुतळा कोसळल्याने तीव्र शब्दांत महाराष्ट्र सरकारचा निषेध केला , व यात दोषी असलेल्या संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली, यावेळी विविध पक्ष संघटनेच्या वतीने या दुर्दैवी घटनेचा निषेध करुन, छत्रपतींच्या बद्दल सहसंवेदना व्यक्त करुन , छत्रपती शिवाजी महारांजाना सामूहिक मानवंदना देण्यात आली,
शिव- शाहींरांच्या पोवाड्याने छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करुन राज्य सरकारचा निषेध करण्यात आला,
कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख अभिजित जगताप यांनी केले होते, यावेळी अभिजित जगताप यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर पवाडा लिहीला तो पवाडा शिवशाहीरांनी आपल्या पहाडी आवाजात गायला , याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, विजयराव कोलते यांनी कौतुक केले.






