न्यू इंग्लिश स्कूल जवळार्जुन विद्यालयाचा प्रतीक टेकवडे राज्यस्तरीय बॉलमिंटन संघाचा कर्णधार
उपसंपादक सह्याद्री माझा नवनाथ राणे :
न्यू इंग्लिश स्कूल, जवळार्जुन विद्यालयाचा प्रतीक टेकवडे राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन संघाचा कर्णधार!
जवळार्जुन : महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन संघटनेतर्फे आयोजित १६ वर्षांखालील राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन संघाची निवड चाचणी पुणे येथील भारतीय विद्यापीठ येथे घेण्यात आली. या निवड चाचणीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची राज्यस्तरीय संघासाठी निवड करण्यात आली.
यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल, जवळार्जुन विद्यालयाचा विद्यार्थी प्रतीक टेकवडे याची राज्यस्तरीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. तसेच विद्यालयातील स्वराज टेकवडे आणि संस्कार कारंडे यांचीही मुलांच्या राज्यस्तरीय संघात निवड झाली आहे.
मुलींच्या राज्यस्तरीय संघात विद्यालयाच्या गायत्री राणे आणि चेतना टेकवडे यांची निवड झाली आहे. बॉल बॅडमिंटन संघटनेचे सचिव धुंडीराज गोसावी यांनी निवड झालेल्या खेळाडूंची घोषणा केली.
विद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सांस्कृतिक, कला, क्रीडा आणि विज्ञान क्षेत्रातही उल्लेखनीय यशाची परंपरा कायम राखली आहे. एकाच विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय संघात निवड होणे ही विद्यालयासह जवळार्जुन गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा आनंदीकाकी जगताप, सचिव संजय जगताप, संस्था विशेष मार्गदर्शक राजेंद्र (बापू) जगताप I.A.S., संस्थापक सचिव-विश्वस्त प्रा. सीए डॉ. एम. एस. जाधव, संस्था समन्वयक सोनाली ताई जगताप, सहसचिव दत्तात्रय गवळी, व्यवस्थापक कानिफनाथ अमराळे, रवींद्र पंत जगताप, मुख्याध्यापक सतीश पिसाळ तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व ग्रामस्थांनी सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक प्रदीप खोमणे यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






