वाघिरे महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
वाघीरे महाविद्यालय, सासवड येथे रक्तदान शिबिर
सासवड, ता. पुरंदर येथील वाघीरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय छात्र सेने द्वारे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या नेतृत्वाखाली मा. अजितदादा पवार,
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवार दि.24/07/2024 रोजी वाघीरे महाविद्यालयात
करण्यात आले होते.
मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.
देविदास वायदंडे ह्यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
ह्यावेळी लेफ्टनंट प्रा. गजेंद्र अहिवळे, डॉ. शितल कल्हापुरे व
प्रा. सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराची व्यवस्था करण्यात आली. अक्षय रक्तपेढी, हडपसर, पुणे येथील 11 डॉक्टरांनी ह्यात सहभाग घेतला. 154 जणांच्या
हिमोग्लोबिन व रक्तदाब तपासणी करण्यात आली. नंतर रक्तदानाच्या निकषानुसार पात्र ठरलेल्या एकूण ४९
जणांनी रक्तदान केले. शिबिरात महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना ज्यात 2 महाराष्ट्र गर्ल्स (48 कॅडेट्स), 36
महाराष्ट्र बटालियन (39 कॅडेट्स) व 3 महाराष्ट्र नेव्हल युनिट (15 कॅडेट्स) यांनी शिबिराची व्यवस्था केली.
ह्यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर व प्रशासकीय कर्मचारी, एनसीसी छात्र, विद्यार्थी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने शिबीर यशस्वी करण्यात सहभाग नोंदवला.






