ताज्या घडामोडी

पुरंदर तालुक्यातील सोमर्डी येथे गरजूंना किराणा किट वाटप; स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचा उपक्रम…


मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
पुरंदर तालुक्यातील सोमुर्डी येथे गरजूंना किराणा किट वाटप.. स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचा उपक्रम..

सासवड (प्रतिनिधी) ऐन दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर सुमारे दीडशेंहून अधिक गरीब व गरजु कुटुंबांना किराणा किटचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम सासवडच्या स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे वतीने करण्यात आले आहे.

पुण्यातील रॉबिन हूड आर्मी या संस्थेच्या वतीने व प्रतिष्ठानच्या पुढाकारातून पुरंदरच्या पश्चिम भागातील सोमुर्डी, दरेवाडी, वारवडी, थापेवाडी यां गावातील अनेक गरीब व गरजु कुटुंबांना किराणा किट, मिठाई व साडी वाटप करण्यात आले.स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, रॉबिन हूड चे कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.

सोमुर्डी येथे गरजूंना किट वाटप केल्याबद्दल पुरंदर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक शांताराम भोराडे यांनी प्रतिष्ठानचे विशेष आभार व्यक्त केले आहेत. या वेळी उपसरपंच मारुती भोराडे, किसन पांगारे, संतोष भोराडे, अनिल पवार, दिपक भोराडे, अनिता पवार, दादा ताठेले ,पांडुरंग भोराडे, गुणाबाई भोराडे, अशोक पन्हाळकर यांसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते


Translate »
error: Content is protected !!