ताज्या घडामोडी

सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत बालदिंडीचे आयोजन


प्रतिनिधी सह्याद्री माझा न्युज: सासवड – येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेत दरवर्षीप्रमाणे पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख परिधान केला
होता. गळ्यात टाळ , खांद्यावर भगवी पताका, मुलींच्या डोक्यावर तुळस घेऊन बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले. अशाप्रकारे सर्व विद्यार्थी आनंदाने पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.
या विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात राम कृष्ण हरी,

ज्ञानोबा तुकाराम च्या नावाचा जयघोष केला. शाळेचे
मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या
वेशातील विद्यार्थ्यांचे तसेच पालखीचे पूजन करून आरती केली. शिक्षिका मंजुषा चोरामले यांनी विद्यार्थ्यांना पालखी सोहळ्याची माहिती दिली. शाळेच्या परिसरातील पालखी मिरवणूक आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. विद्यार्थ्यांनी फुगड्या खेळत आनंद व्यक्त केला. शिक्षक नरेंद्र महाजन यांनी भजन, अभंग यांचे गायन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी जगताप यांनी केले. यावेळी

मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते


Translate »
error: Content is protected !!