शिक्षक दिनानिमित्त मलकापूर येथे नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025 उत्साहात
शिक्षक दिना निमित्त मलकापूर येथे नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025 उत्साहात
आळंदी / प्रतिनिधी :
शिक्षक दिनानिमित्त मलकापूर येथील भातृ मंडळात हिंदी-मराठी पत्रकार संघाच्या वतीने नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025 प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मान्यवरांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.
या पुरस्कारासाठी आलेल्या ऑनलाइन प्रस्तावांमधून निवड करून गुणवंत व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल अनेक शिक्षकांसह अर्जुन मेदनकर, शाहा, श्याम शेलार यांनाही नॅशनल आयकॉन अवॉर्ड देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रा. अनिल खर्चे (प्राचार्य, व्ही.बी. कोलते इंजिनिअरिंग कॉलेज) होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाई अशांत वानखेडे, धनश्रीताई काटीकर पाटील, बाळासाहेब दामोदर, ॲड. सम्यक चवरे, दामोदर शर्मा, विजयकुमार डागा, दिलीप आढाव, सरिता पाटील, विद्या काळबांडे, डॉ. प्रदीप गायकी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सर्वपल्ली राधाकृष्णन, बाळशास्त्री जांभेकर व तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमापूजनाने झाली. यावेळी पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक कार्य, कला, वैद्यकीय, वकिली, उद्योजकता, क्रीडा, कृषी अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांना नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आले.
देशसेवेसाठी कार्यरत माजी सैनिक, आशा स्वयंसेविका महिला यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र गंणगे यांनी तर आभार प्रा. प्रकाश थाटे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुधाकर तायडे, नथूजी हिवराळे, विनायक तळेकर, विजय भगत, मयूर लड्डा, आत्माराम मोरे, भाऊराव व्यवहारे, राजू घाटे, अमोल वानखेडे, ऋषिकेश तेजेकर, मुकुंदा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.






