ताज्या घडामोडी

आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पुरंदरची आमसभा संपन्न, सर्वच विभागातील प्रशासनाला जनतेने धरले धारेवर


पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन सासवड

आम सभा पार पडली,
पुरंदर पंचायत समिती, पुरंदर प्रांत,पुरंदर तहसीलदार,सासवड नगरपालिका, जलसंधारण विभाग,

महाराष्ट्र इलेक्ट्रिक बोर्ड पुरंदर, एसटी आगार सासवड, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतर प्रशासनातील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही आम सभा

पार पडली, यावेळी अनेक ठराव सर्वानुमते ठरवून पास करण्यात आले,
यावेळी पुरंदरच्या जनतेने, विविध गावातून आलेले सरपंच

उपसरपंच, आम जनता यांच्या प्रश्नाने प्रशासनातील प्रत्येक विभाग ढवळून काढला, यामध्ये सर्वात जास्त रोष महाराष्ट्र इलेक्ट्रिक महामंडळावर होता यामध्ये डीपी, कनेक्शन, तारा

वाढीव विज बिल यावर सर्वच लोकांनी हल्लाबोल केला, रस्ते बांधकाम विभागातील अनधिकृत होर्डिंग यावर काय कारवाई केली, सासवड मधील रस्ते आरोग्य यावर कुठल्या

प्रकारे काम चालू आहे, जेजुरी ग्रामीण मधील भागांना ग्रामपंचायत दर्जा कधी मिळणार, पुरंदर उपसा योजनेच्या त्रुटी व समस्या, पानंद रस्ते, गावठाण रस्ते, गायरान, या

सर्वच प्रश्नांनी प्रशासनातील प्रत्येक विभाग यांची पळापळ झाली, अधिकाऱ्यांनी जनतेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे

देण्यास टाळाटाळ केल्यानंतर, आमदार संजय जगताप यांना जनतेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत होती, एकंदरीत आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून

झालेली ही आमसभा विशेष वादळी ठरली, परंतु नागरिकांनी दिलेल्या लेखी समस्या, आणि त्यावर होणारी प्रशासनाची कारवाई काय होते याकडे संपूर्ण पुरंदर

 

तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे
यावेळी आमदार संजय जगताप, प्रांत वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी अमिता

पवार, तसेच प्रशासनातील सर्वच अधिकारी, सर्वच पक्षातील नेते यावेळी उपस्थित होते


Translate »
error: Content is protected !!