ताज्या घडामोडीपुणे

पुरंदर तालुक्यातील शेतकरी बांधवांची अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा::

पुरंदर तालुक्यातील शेतकरी बांधवांची अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी

पुरंदर तालुक्यातील शेतकरी बांधवांची अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक

पुरंदर तालुक्यातील शेतकरी बांधवांची अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई, फळबागात दारांचे विशेष करून, आंबा उत्पादकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळामुळे तसेच फळ माशीमुळे 120 ते 150 रुपये प्रति किलो मिळणारा भाव ,सध्या हा फक्त 20 ते 25 रुपये प्रति किलो असा झालेला असून,

या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना आंबा उत्पादनासाठी केलेला खर्चही वसूल होत नाही, त्यामुळे शेतकरी बांधव फार मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याचे दिसून आले आहे. सदर नुकसानीचा आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन, पंचनामा करून, पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना फळ, बागायतदारांना एकरी एक लाख रुपये

नुकसान भरपाई देण्यात यावी, यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला, कांदा, भुईमुंग, चारा, पीक इत्यादी पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याचा पंचनामा हा पुरंदर तालुक्यातील सर्व ठिकाणी जाऊन, आपण करावा अशी मागणी, पुरंदरचे तहसीलदार विक्रम

राजपूत यांच्याकडे, जालिंदर कामठे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी, यांच्यासह संतोष जगताप सासवड शहर माजी अध्यक्ष, भानू (काका) जगताप माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, संदीप देवकर अध्यक्ष पुरंदर तालुका किसान मोर्चा भाजपा, सचिन पठारे माजी सरपंच, शिवाजी साळुंखे, गणेश जाधव, नदीम इनामदार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.


Translate »
error: Content is protected !!