ताज्या घडामोडीपुणे

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सासवडला नगरपालिका व एस टी खात्याकडून वृक्षारोपण


संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सासवडला नगरपालिका व एस. टी खात्याकडून वृक्षारोपण…

सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक ५ जुन जागतिक पर्यावरण दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत असून, या निमित्ताने सासवड नगरपालिका व सासवड एस. टी आगार यांच्या वतीने एस. टी स्टँड व पालखीतळ परिसरात पन्नासहून अधिक जंगली वृक्ष लागवड करून, व पर्यावरण संदेशाची शपथ घेऊन, हा दिवस साजरा करण्यात आला. पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, सासवड आगार प्रमुख सागर गाडे यांसह दोन्ही खात्यांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक या प्रसंगी उपस्थित होते.

सासवड नगरपालिका शहर समन्वयक राम कारंडे यांनी या प्रसंगी उपस्थितांना शपथ दिली ,तर स्व .एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे सचिव हेमंत ताकवले यांनी पर्यावरण व वृक्ष लागवडीचे महत्व यांवर भाष्य केले. केवळ झाडे लावून गाजावाजा न करता त्या झाडांचे वाढदिवस साजरे करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

नगरपालिकेंचे मोहन चव्हाण, जावेद मुल्ला, निखिल कांचन, संकेत नंदवंशी, गजानन नरवाडे, बजरंग जगताप, सुवर्णा ठोके , हेमलता शिंदे
सविता जगताप, जस्मिन मधाळे, सुलोचना हालसे , ओंकार शिंदे या अधिकाऱ्यांसह एस. टी आगारातील महेश भोंगळे, पोपट जैनक, रामचंद्र गावडे, विकास काकडे, शशिकांत चव्हाण
संतोष शिंदे, संतोष दुधाळ, विजय कोलते, पथारी संघटनेचे गुलाब सोनावणे पुरंदर नागरी पतसंस्थेचे अनिल उरवणे व नागरीक यावेळी हजर होते.


Translate »
error: Content is protected !!