सामाजिक कार्यकर्ते सुभाष ढवळे यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यकर्ता पुरस्कार प्रदान
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
*सामाजिक कार्यकर्ते सुभाष ढवळे यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान.*
श्रीगोंदा तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्र मध्ये अहिल्यानगर सह 36 जिल्ह्यामध्ये हाळगाव ता.जामखेड जि.अहिल्यानगर येथील गरिबांसाठी झळकणारा हिरा युगपुरुष श्री सुभाष ढवळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आजपर्यंत सर्वधर्मीय मुला-मुलींचे 1275 शुभविवाह जमविले आहेत
दोन्हीही घरांचे मिलन माणुसकी जपणारा माझा सहकारी मित्र ढवळे वधु वर सूचक श्रीगोंदा अध्यक्ष श्री सुभाष ढवळे यांना प्रहार दिव्यांग संघटना अहिल्यानगर आणि जय मल्हार फाउंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला अहिल्यानगर लक्ष्मी मंगल कार्यालय येथे
एका कार्यक्रमात श्री सुभाष ढवळे यांना पुरस्कार प्रदान करतांना यशवंत सेना सर सेनापती महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष श्री माधवजी गडदेसाहेब अहिल्यानगर यशवंत सेना जिल्हा अध्यक्ष श्री विजय तमनर आमदार श्री संग्रामभैय्या जगताप यांचे बंधू श्री सचिनभैय्या जगताप खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन जिल्हाप्रमुख श्री राजेंद्र पोकळेसाहेब या सर्व पदाधिकारी
यांच्या हस्ते श्री सुभाष ढवळे यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला श्री सुभाष ढवळे यांना हा पुरस्कार मिळाला बद्दल ढवळे यांचे विधान परिषदेचे सभापती श्री राम शिंदेसाहेब माजी मंत्री बबनराव पाचपुते
अहिल्यानगर चे आमदार श्री संग्रामभैय्या जगताप श्रीगोंदा चे विद्यमान आमदार विक्रम पाचपुते सांगली राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षा श्री अनिताताई कदम यासह महाराष्ट्रातील अनेकांनी सुभाष ढवळे यांचे अभिनंदन केले कार्यक्रमासाठी जिल्ह्यासह राज्यातील अनेक पत्रकार आणि इतर मान्यवर उपस्थित होते






