रामोशी बेरड बेडर समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यासाठी 5 सप्टेंबर पासून आमरण उपोषण – भाऊसाहेब शिंदे
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
रामोशी बेरड बेडर समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्या राज्य सरकारने पंधरा दिवसात पूर्ण कराव्यात अन्यथा 5 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता भाऊसाहेब रामदास शिंदे हे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारक भिवडी
या ठिकाणी करणार आमरण उपोषण,
राज्यात रामोशी बेरड बेडर समाजाची लोकसंख्या 80 लाखा पेक्षा जास्त असून हा समाज राजकीय शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या मागास आहे त्यामुळे या
समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, राज्य शासनाने स्थापन केलेल्या राजे उमाजी नाईक महामंडळ त्याचा अध्यक्ष रामोशी बेरड बेडर समाजातील व्यक्ती असावा, समाजाच्या लोकसंख्येच्या मानाने एका व्यक्तीला विधान परिषदेवर संधी द्यावी, आद्य क्रांतिवीर
राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती दिल्ली येथील संसद भवनात साजरी करण्यात यावी अशा अनेक मागण्यासह भाऊसाहेब रामदास शिंदे हे आमरण उपोषणास बसणार
असून राज्य सरकार व केंद्र सरकारने ताबडतोब कारवाई करावी व समाजाला न्याय मिळवून द्यावा यासाठी हे उपोषणाच्या हत्यार भाऊसाहेब रामदास शिंदे यांनी उपसले आहे






