अत्रेंचे संमेलन साहित्यिक ,सांस्कृतिक क्षेत्रातील प्रकाश बेट – डॉ न. म. जोशी अत्रे संमेलनाचा समारोप समारंभ
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
अत्रेंचे संमेलन साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील प्रकाश बेट- डॉ.न.म.जोशी*
अत्रे संमेलनाचा समारोप समारंभ.
सासवड : सासवडला प्रत्येक वर्षी होत असलेले अत्रेंचे साहित्य संमेलन म्हणजे एका अर्थाने साहित्यिक , सांस्कृतिक क्षेत्रातील प्रकाश बेट असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षण तज्ञ डॉ. न.म. जोशी यांनी काढले. ते पुढे म्हणाले अत्र्यांनी जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात मुशाफिरी केले.त्यांनी आपल्या आयुष्यातील अत्रेंच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या स्मृती जागविल्या.
नवीन शैक्षणिक धोरणावर बोलताना डॉ.जोशी म्हणाले विद्यार्थ्यांना केवळ माहिती न देता त्यांना ज्ञान व संकल्पना समजावून देता यायला हवे . कौशल्य आणि विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन , कृतिशील शिक्षण,प्रात्यक्षिकांवर भर इत्यादी गोष्टींवर भर देण्यात आला आहे. त्यांची अंमलबजावणी मात्र यशस्वी व्हायला हवी. त्यावरच या शैक्षणिक धोरणाचे यश अवलंबून आहे .
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान , पुरंदर व महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा यांचे संयुक्त विमाने 28 वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन अत्रेंच्या 127 व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केले होते.याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. न. म. जोशी , डॉ.सु.ल. खुटवड, डॉ.विनायक खाडे ,प्राचार्य प्रसन्नकुमार देशमुख, ॲड.दिलीप निरगुडे व्यासपीठावर उपस्थित होते.या प्रसंगी विजय कोलते, बंडू काका जगताप ,गौरव कोलते, कुंडलिक मेमाणे, वसंतराव ताकवले, प्राचार्य डॉक्टर सुभाष तळेकर, नारायण टाक आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सतीश पाटील यांनी तर आभार डॉ. राजेश दळवी यांनी मांनले.






