पुरंदर काँग्रेस व राष्ट्रवादीला खिंडार मधील अनेक युवकांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
202 पुरंदर विधानसभा निवडणुक महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय बापू शिवतारे निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ शिवरी येथील श्री यमाई माता मंदिरात मोठ्या उत्साहात
फोडण्यात आला, या कार्यक्रम प्रसंगी पुरंदर हवेली चे माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे, पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे, शिवसेना जिल्हा प्रमुख आबा यादव, पुरंदर हवेली विधानसभा भाजपाध्यक्ष
बाबाराजे जाधवराव, भाजप पुरंदर अध्यक्ष निलेश जगताप, शिवसेना पुरंदर अध्यक्ष हरिभाऊ लोळे, उद्योजक अनिल कामथे, शिवसैनिक प्रवीण कामथे, आबा कामथे धनंजय कामथे, समीर कामथे, नवनाथ गायकवाड, शिवशंभो मित्र मंडळाचे सर्व शिवसैनिक, लिंबोरे परिवार
शिवसैनिक, याचबरोबर पुरंदर हवेलीतील असंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते, पुरंदर मधून अनेक गावातील तरुणांनी हातामध्ये शिवबंधन बांधत अधिकृतरित्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला, यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये मोठे खिंडार पडले असून आम्ही सर्वजण बापूंना निवडून आणण्यात मोठा वाटा उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले, यावेळी बापूंनी सर्व योजना समजून सांगताना आमदार संजय जगताप, संभाजीराव झेंडे यांच्यावर वर कडाडून हल्लाबोल केला. अशोकराव टेकवडे यांनी हल्लाबोल करताना सासवडच्या स्पीड ब्रेकर चे उदाहरण देत पुरंदरच्या विकासाच्या स्पीड ब्रेकरला आता थांबवावे लागेल व विजय बापू शिवतारे मोठ्या मताधिकाने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी ओंकार जाधव सासवड, यश बंड सासवड, गणेश भांडे, पियुष कोंडे मावडी, विजय देशमुख मावडी, विशाल वानखडे सासवड, शंभूराजे जगताप नावळी, आकाश बडदे सासवड, गणेश काडे सासवड, विठ्ठल कांबळे सासवड, प्रसाद कदम दौंडज, गौतम जगताप सुपे, तेजस म्हेत्रे सासवड, नवनाथ महानवर मावडी कप, सुनील गावडे सासवड, विजय पिसाळ माहूर, सुनील पवार साकुर्डे, अथर्व पाटील जेजुरी, संतोष जाधव राख, साई मोरे अजय मोरे जेजुरी, विजय जगताप सासवड, राज चव्हाण जेजुरी अशा पुरंदर मधील अनेक गावातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पार्टीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला





