स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दादा फाउंडेशनच्या वतीने आयबीएम महाराष्ट्र न्यूज चैनल चे संपादक असिफ मुजावर यांना पुरस्कार वितरण समारंभ संपन्न!
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
आयबीएम महाराष्ट्रला आदर्श पत्रकारिता पुरस्कार; असिफ मुजावर यांचा गौरव, योगेश जगताप यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार
दादा फाऊंडेशनचा उपक्रम
जेजुरी, दि. १६ (वार्ताहर) – अल्पावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या आयबीएम महाराष्ट्र न्यूज चॅनेलला दादा फाऊंडेशनच्या वतीने ‘आदर्श पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. आयबीएम महाराष्ट्रचे संपादक असिफ मुजावर यांना हा पुरस्कार देऊन त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला. तसेच जेजुरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक योगेश रोहिदास जगताप यांना ‘आदर्श नगरसेवक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
जुन्या पालखी मैदानात ध्वजारोहण व ध्वजवंदन कार्यक्रम पार पडल्यानंतर शनिवारी (दि. १५) जेजुरी नगरपालिकेच्या सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास जेजुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, नगरसेवक कृष्णा कुदळे, स्वप्नील हरपळे, रोहित खोमणे, शिवाजी जगताप, अस्लम पानसरे, अभिजित कुदळे, तसेच नगरसेविका नीलम सातभाई, मोनिका घाडगे, प्रज्ञा राऊत, मंदा बयास, मेघा उबाळे, भक्ती कोरपड, स्नेहल भालेराव, योगिता दोडके, स्वरूपा खोमणे उपस्थित होत्या.
याशिवाय दादा फाऊंडेशनचे अध्यक्ष यशवंत दोडके, कार्यवाह शिवराज झगडे, उपाध्यक्ष रमेश लेंडे, तसेच राजू जावळेकर, सुशील राऊत, राजू पानसरे, गौतम भालेराव, सत्यवान उबाळे, रमेश बयास, आकाश भोईटे, संतोष खोमणे, उन्मेष बारभाई आदींसह जेजुरीकर ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष जयदीप बारभाई म्हणाले, “कमी वयात आणि कमी कालावधीत आयबीएम महाराष्ट्र न्यूज चॅनेलने ५ कोटींपेक्षा अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा टप्पा गाठला आहे. देशासोबतच विदेशातही आयबीएम महाराष्ट्रचे व्हिडिओ पाहिले जात असून, निर्भीड पत्रकारिता करणारे माध्यम म्हणून या चॅनेलची ओळख निर्माण झाली आहे.”
तर दादा फाऊंडेशनचे कार्यवाह शिवराज झगडे यांनी सांगितले की, “सिलेक्टेडमधून इलेक्टेड झालेल्या कमी वयातील नगरसेवक योगेश जगताप यांचा प्रवास आदर्शवत आहे. नागरिकांच्या अडीअडचणी आणि समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात.”
निर्भीड पत्रकारितेचा सन्मान आणि उत्कृष्ट लोकप्रतिनिधींचा गौरव अशा दुहेरी स्वरूपात पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली.






