ताज्या घडामोडी

दिवे गावचे सुपुत्र विंग कमांडर स्व. विजय झेंडे यांच्या स्मरणार्थ प्राथमिक शाळा या ठिकाणी वृक्षारोपण


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा:-
दिवे गावचे सुपुत्र आणि भारतीय हवाई दलातील अधिकारी विंग कमांडर विजय झेंडे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते त्यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वर झेंडे व सिंधुताई झेंडे व

त्यांच्या कुटुंबियांनी दिवे गावठाणातील प्रार्थमिक शाळा दिवे येथे वृक्षारोपण केले या शाळेसमोर आंबे,नारळ,चिकू,फणस,चिंच,
कवठ, अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली

आहेत या सर्व झाडांना पाण्यासाठी ठिबक सिंचन प्रणाली बसविण्यात आली आहे शिवाय या सर्व झाडांची निगा देखील तीन वर्षे झेंडे कुटुंब राखणार आहे त्यामुळे नजीकच्या काळात या शाळेतील विद्यार्थ्यांना या वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची चव चाखायला मिळणार आहे त्यामुळे या उपक्रमाचे दिवे परिसरातून कौतुक केले जात आहे

यावेळी माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे,पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी . तानाजी बरडे, तालुका कृषी अधिकारी. सुरज जाधव,

श्रीमती वैष्णवी विजयकुमार झेंडे, कृषी विभागाचे मा. संचालक दिलीप झेंडे, दिवे गावचे सरपंच योगेश काळे, मा. सैनिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदेव कुंभारकर, उपाध्यक्ष चंद्रकांत कुंभार, उत्तम आबा झेंडे, श्रीरंग झेंडे,अनिल झेंडे,दिवे गावचे तलाठी सतीश काशिद, काळेवाडीचे तलाठी

रोहन यादव,विस्तार अधिकारी प्रताप मेमाणे, रमेश झेंडे , मुरलीधर झेंडे, सुरेश झेंडे बाळासाहेब झेंडे, सुधीर झेंडे तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष सुरेश झेंडे, पोपट झेंडे, दत्तात्रय तुपे, माजी उपसरपंच रूपाली झेंडे,पुणम जगताप, अंबिका झेंडे, सागर तात्या काळे, सुरेश टिळेकर, अशोक आबा

झेंडे दिव्या झेंडे, रेखा झेंडे,शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री कुंजीर ,निशा वढणे,सुकुमारि निकम, आणि विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक टिळेकर यांनी केले तर आभार वैशाली खोमणे यांनी मानले …..


Translate »
error: Content is protected !!