जेजुरी पोलीस स्टेशनचे कैलास सरक यांची पोलीस हवालदार पदी पदोन्नती सर्वांनी दिल्या शुभेच्छा
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
जेजुरी पोलीस स्टेशनचे कार्यतत्पर पोलीस नाईक कैलास सरक यांची पोलीस हवालदार पदी पदोन्नती झाल्यामुळे जेजुरीतील असंख्य नागरिकांनी, तसेच संघटनांनी त्यांना
पुढील प्रशासकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत, कैलास सरक यांनी सासवड पोलीस स्टेशन, जेजुरी पोलीस स्टेशन, तसेच ग्रामीण पोलीस दलामध्ये विविध ठिकाणी सेवा बजावलेली आहे, सासवड पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्यावर
असताना मोका सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये सासवड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे शोध पथकात असताना मोका सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपीवर कारवाई करत गजाआड केले आहे, तसेच पुरंदर तालुक्यात विविध ठिकाणी समाजसेवा
केलेली आहे समाजसेवेची आवड असणारे हे पोलीस प्रशासनातील व्यक्तिमत्व सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे, सध्या ते जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्यावर आहेत






