ताज्या घडामोडी

वाघिरे महाविद्यालयात हिंदी दिवस मोठ्या उत्साहात संपन्न, हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा – प्राचार्य पंडित शेळके


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा :
वाघिरे महाविद्यालयात हिंदी दिवस मोठ्या उत्साहात संपन्न

वाघीरे महाविद्यालय, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे येथे हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य

डॉ. पंडित शेळके होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सुभाष
नप्ते यांच्या प्रस्तावक केले. त्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व आणि तिच्या विकासावर आपले विचार मांडले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. शेळके यांनी हिंदी भाषेच्या सांस्कृतिक व शैक्षणिक महत्त्व विशद केले. हिंदी भाषा ही केवळ आपली राष्ट्रभाषा नसून ती देशाच्या

संस्कृतिक विविधतेचे प्रतीक असल्याचे सांगितले.भाषेची समृद्ध परंपरा आणि साहित्यिक वारसा समजून घेण्याची संधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ग्रंथालयात असून हिंदी भाषेच्या विकासासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेबद्दल एक नवा उत्साह आणि जागरूकता निर्माण झाली.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुभाष वाव्हळ, विज्ञान शाखेचे डॉ. बबन माने, डॉ. विलास वाणी, डॉ. नानासाहेब पवार, डॉ. रोहिदास ढाकणे, डॉ.

किरण गाढवे, प्रा. नितिन लगड, प्रा. समीर कुंभारकर, डॉ. आनंद सारंगे, प्रा. दीपक उजागरे, प्रा. सुजाता निकम, कार्यालयीन अधीक्षक श्री.अशोक कोंडावळे श्री.रवी जाधव,तसेच शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थ्यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी कल्याणी आबनावे हिने केले तर आभार प्रा.अनिल झोळ यांनी मानले


Translate »
error: Content is protected !!