बजरंग केशव सोनावले यांना प्रशासकीय सेवेबाबत महात्मा फुले कार्यगौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान सोहळा संपन्न
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
प्रशासनातील उत्कृष्ट सेवा बाबत घेरा पानवडी चे तलाठी बजरंग केशव सोनावले यांना उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न
महात्मा फुले यांच्या जन्मगावी खानवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषदेच्या वतीने सतरावे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन उत्साहा मध्ये पार पडले
यावेळी कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय, साहित्य, कला, वैद्यकीय या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना या संमेलनामध्ये गौरविण्यात आले तसेच पुरंदर घेराचे महसूल अधिकारी बजरंग केशव सोनावले यांनी प्रशासकीय सेवेत भरीव
योगदान दिल्याबद्दल माजी न्यायाधीश वसंतराव पाटील माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांच्या हस्ते राज्यस्तरीय महात्मा फुले उत्कृष्ट प्रशासकीय सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी मुख्य संयोजक दशरथ यादव, राजा भाऊ जगताप, गंगाराम जाधव, सुनील लोणकर, देविदास
झुरुंगे संजय सोनवणे,दीपक पवार रवींद्र फुले (माजी सरपंच खानवडी), सुनील धीवार (संस्थापक अध्यक्ष बहुजन हक्क परिषद), निमंत्रक छायाताई नानगुडे (सचिव महिला जिल्हा पत्रकार संघ) गौरव विजयराव कोलते( पुरंदर पब्लिसिटीचे अध्यक्ष) (राष्ट्रपती पदक विजेते पोलीस अधिकारी कवी लेखक) सिताराम नरके साहेब यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.






