श्रीक्षेत्र भुलेश्वर येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने खिचडी वाटप
सासवड प्रतिनिधी सह्याद्री माझा
भुलेश्वर येथे अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने खिचडी वाटप .
महाराष्ट्रातील जागृत देवस्थान श्री क्षेत्र भुलेश्वर येथे तिसरा श्रावणी सोमवार रोजी दिवसभरात हजारो भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. मंदिर परिसरातील तरुण भाविकांनी
मध्यरात्री बारानंतर मंदिरात येऊन दर्शन घेण्यास सुरुवात केली. नेहमी प्रमाणे पहाटे शिवलिंगास दही, दूध व पंचामृताने अंघोळ घालण्यात आली. पहाटे पाच वाजता माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने महाआरती करून मंदिर
भाविकांसाठी खुले करण्यात आले. दुपारी बारा वाजता पाण्याच्या कुंडापाशी भुलेश्वरास मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंघोळ घालण्यात आली. महाआरती करून पालखी व कावड मिरवणूक काढण्यात आली. दुपारी दोन
वाजता मंदिराच्या प्रवेश द्वारावरती मानाच्या कावडींची धार घालण्यात आली. त्यानंतर पालखीची महाआरती करण्यात आली यावेळी भाविक भक्तांना सालाबाद प्रमाणे 500 किलो खिचडी वाटपाचा कार्यक्रम अखिल भारतीय मराठा
महासंघाच्या दौंड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आयोजित केला होता दुपारी 11.30.पासून ते 6.00 वाजेपर्यंत जवळपास 5500 भाविक भक्तांनी खिचडी चा लाभ घेतला या
कार्यक्रमाचे आयोजक संजय तात्या थोरात,बाळासाहेब खेनट अतुल आखाडे लक्ष्मण खेनट राहुल शेळके नागनाथ मुळीक राहुल थोरात.दीपक शेळके श्याम कदम संकेत थोरात.तुकाराम आखाडे.चंद्रकांत आखाडे. अशोक सोनवणे विनोद तारू महादेव शेलार पत्रकार आदी दात्याचे सहकार्य लाभले.






