श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर येथे वैशाख वैद्य सोमवती अमावस्यानिमित्त भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा:
श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर येथे वैशाख वैद्य सोमवती अमावस्यानिमित्त भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी
श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर येथे वैशाख वैद्य सोमवती अमावस्या निमित्त भाविकांची दर्शनासाठी आलोट गर्दी; तर सोमवती अमावस्या निमित्त श्रीनाथांना घोडे उड्डाण येथे ‘निरास्नान’
सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक श्री शेत्र वीर (ता. पुरंदर) येथे सोमवार सोमवती अमावस्या निमित्त श्रीनाथाना मस्कोबा मंदिरात, भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. सकाळपासूनच देवस्थान ट्रस्ट व भाविका तर्फे देवाला अभिषेक करण्यात आले होते. सकाळी दहा वाजता देवाला भाविकांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या.
देऊळ वाड्यात दगडी कासवावर, सालकरी, गोसावी मंडळीचा पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता. दुपारी साडेअकरा वाजता धूप आरती होऊन, दुपारी श्रीनाथाची पालखी सर्व लवाजमासहित, सालकरी, मानकरी दागीनदार, ग्रामस्थ भाविक निरास्नान साठी श्री शेत्र घोडे उड्डाण_ येथे गेले होते, यासंबंधी पूर्व नियोजन संपूर्ण विश्वस्त मंडळ वीर देवस्थान यांनी केले होते.
मंदिरात महाप्रसादाचे आयोजन मधुकर समगीर परिवार वीर समस्त ग्रामस्थ व राजेवाडी (बधे) यांच्या मार्फत करण्यात आले होते. दुपारी घोडेउड्डाण येथे उत्सव मूर्तींना निरास्नान घालण्यात आले. यावेळी सर्व भाविक, सालकरी, मानकरी, दागिनदार, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. यानंतर देवाची पालखी ग्राम प्रदक्षिणा करीत,
देऊळ वाड्यात आली, यावेळी देवस्थान ट्रस्टमार्फत पिण्याचे स्वच्छ पाणी, लाईट व जनरेटर, दर्शनाभारी, वाहनतळ व्यवस्था, परिसर स्वच्छता, होमगार्ड यांचे नियोजन करण्यात आले होते, अशी माहिती राजेंद्र धुमाळ व अमोल धुमाळ यांनी दिली. यावेळी विश्वस्त काशिनाथ धुमाळ, प्रमिला देशमुख, सुनिल धुमाळ, विराज धुमाळ, अमोल धोंडीबा धुमाळ, श्रीकांत थिटे, बाळासो समगीर, जयवंत सोनावणे, अलका जाधव आदी विश्वस्त मंडळ, तसेच सल्लागार मंडळ आदी उपस्थित होते.






