ताज्या घडामोडी

पुरंदर मधील श्री क्षेत्र वीर आणि गुळूंचे देवस्थान साठी सहा कोटी 47 लाखाचा निधी… आ संजय जगताप यांची माहिती


पुरंदरमधील श्रीक्षेत्र वीर आणि गुळुंचे देवस्थानसाठी ६ कोटी ४७ लाखांचा निधी….. आ संजय जगताप यांची माहिती.

सासवड :-

पुरंदर तालुक्यातील तिर्थक्षेत्र ” ब ” दर्जा असणाऱ्या श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान आणि श्रीक्षेत्र गुळूंचे येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थान परीसर विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने एकूण ६ कोटी ४७ लाख ५८ हजार रूपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी दिली.

श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान आणि श्रीक्षेत्र गुळूंचे येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थान ही दोन्ही देवस्थान महाराष्ट्रात प्रसिद्ध असून दोन्ही देवस्थान तिर्थक्षेत्र ” ब ” वर्गात आहेत. देवस्थान परीसरातील विविध विकास कामांसाठी शासनाकडून हा निधी देण्यात आला असून त्याबाबतची मंजूरी पत्रके दोन्ही देवस्थानच्या प्रतिनिधी आणि ग्रामस्थांना देण्यात आली आहेत. सदर विभागाचे सहसचिव का गो वळवी यांनी याबाबतचे परीपत्रक जाहिर केले आहे. आमदार संजय जगताप यांनी याबाबत सतत पाठपुरावा केल्याने हा निधी मिळाला असल्याचे वीर देवस्थानचे विश्वस्त आणि सचिव अभिजित धुमाळ तसेच सरपंच माऊली वचकल आणि गुळूंचे गावचे उपसरपंच दिपक निगडे यांनी सांगितले.

श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर साठी २ कोटी ७५ लाख ९७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये भक्त निवासासाठी १ कोटी ३९ लाख ६६ हजार रुपये, संरक्षक भिंतीसाठी ८६ लाख १६ हजार, शौचालयांसाठी ३३ लाख ५१ हजार आणि परीसरातील

पथदिव्यांसाठी १७ लाख २४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबरोबरच गुळुंचे येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थानसाठी ३ कोटी ७१ लाख ६१ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये पुरूष व महिलांसाठीच्या स्वतंत्र भक्त निवासासाठी २ कोटी २६ लाख ८२

हजार, संरक्षक भिंतीसाठी ९१ लाख, शौचालयांस ठी३३ लाख ५१ हजार, पथदिव्यांसाठी १७ लाख २४ हजार रुपये आणि पीसीसी संरक्षक भिंतीसाठी ३ लाख ४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या कामांची सुरूवात होणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.


Translate »
error: Content is protected !!