भिवरी येथे एक जून वाढदिवस असणारे तब्बल 47 ग्रामस्थांचा सामूहिक वाढदिवस साजरा
संपादक- सह्याद्री माझा हनुमंत वाबळे;:
भिवरी येथे एक जून वाढदिवस असणारे तब्बल 47 ग्रामस्थांचा सामूहिक वाढदिवस साजरा
भिवरी येथे सत्तेचाळीस ग्रामस्थांचा सामुहिकरित्या वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळेस भिवरी ग्रामपंचायत चे उपसरपंच श्री मारूतीनाना कटके यांच्या शुभहस्ते मान्यवर ग्रामस्थांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वांचा सामुहिकरित्या एक केक कापण्यात आला.
शुभारंभ टाॅवर्स यांच्याकडून उपस्थित ग्रामस्थ व वाढदिवस असणारे अशा सर्वांना चहा-साखर देऊन गोड करण्यात आले. वाढदिवस हा आनंदाचा क्षण गावकरी एकत्र येऊन साजरा करण्याचा हा विरळ क्षण सर्वांना आनंद देऊन गेला. वाढदिवस असञाऱ्या युवक जेष्ठांचा आनंद द्विगुणीत झाला.
वाढदिवसाचा हा कौतुक सोहळा साजरा करताना गावचे मा सरपंच श्री संजय दिनकर कटके पाटील मा सरपंच श्री दिलीप आप्पा कटके पाटील , मा सरपंच श्री विशाल कटके पाटील , चेअरमन श्री म्हस्कूआबा कटके पाटील , व्हा चेअरमन सुनील गोफणे , आदर्श शिक्षक दादा कटके पाटील , श्री अनिल ढवळे , श्री संभाजीआबा नाटकर , श्री शेखर कटके , अध्यक्ष श्री सागर कटके , श्री किरण शांताराम कटके पाटील , श्री विकास पोपट कटके पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.






