ताज्या घडामोडीराजकीय

भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी अजिंक्य टेकवडे


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी पुरंदर तालुक्यातील अजिंक्य टेकवडे यांची निवड झाली आहे,

विधान परिषदेचे युवा आमदार व भाजपाचे महामंत्री विक्रांत पाटील व भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी अजिंक्य टेकवडे यांची सचिव पदी निवड केली असून

त्यांना पुण्यातील कार्यक्रमात नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, बादल कुलकर्णी, निखिल चव्हाण, योगेश मेंद,
उपाध्यक्ष अमृत मारणे , डॉ निवेदिता एकबोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

निवडीनंतर अजिंक्य टेकवडे म्हणाले की, युवा वर्गासाठी केलेले प्रामाणिक कार्य, शिबिर ,संमेलन याची दखल पक्षाने घेतल्याबद्दल पक्षाचा मी ऋणी आहे, येणाऱ्या काळात भाजपचे ध्येयधोरण युवकांपर्यंत पोहोचवून मोठ्या ताकतीने

भारतीय जनता पार्टीचे काम करेल असे अजिंक्य टेकवडे यांनी सांगितले, या जोडीबद्दल दौंड शानदार राहुल कुल, कसल्याचे आमदार भीमराव तापकीर, माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांनी शुभेच्छा दिल्या


Translate »
error: Content is protected !!