ताज्या घडामोडीपुणे

महावितरण च्या कर्मचाऱ्यांची सासवड शहरातून जन जागृतीसाठी बाईक रॅली


मुख्य संपादक हनुमंत वाबळे::

महावितरणच्या कर्मचाऱ्यांची सासवड शहरातुन जन जागृतीसाठी बाईक रॅली…

सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक जनसामान्यांशी निगडीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरणने विद्युत सुरक्षा, होणारे अप घात, विजेची बचत या अनुषंगाने १ जून ते ६
जून या कालावधीत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले आहे.

या अभियानांतर्गत सासवड महावितरण शाखेने आज गुरुवारी सासवड शहरातून एका जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन केले होते. मोठ्या संख्येने मोटारसायकलवर कर्मचारी हातात जागृतीचे फलक घेऊन सहभागी झाले होते.

“आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शून्य अपघाताने करू महावितरणचे स्वप्न साकार” अशा स्वरुपातील या रॅलीने महावितरण कार्यालय, जेजुरी नाका, पोलिस स्टेशन, नगर पालिका, हडको वसाहत, रिलायन्स पंप, त्रिशूल सोसायटी
सोनोरी रोड , पंचायत समिती व परत मूळ ठिकाणी अशी
रॅली काढून सर्वसामान्याच्यात प्रबोधन केले.

महावितरणचे अपघात प्रमाण कमी झाले आहे, तरीही लहान मुले, सर्व सामान्य नागरिक यांच्यात हे प्रमाण अधिक आहे. त्यासाठी या जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता भालचंद्र गवई यांनी दिली. आजच्यारॅलीत नितीनकुमार पवार, गणेश चांदणे,रोहित दामसे,अनंत पवार, वाघमारे आदी अधिकारी व मोठ्या संख्येने कर्मचारी, जनमित्र सहभागी झाले होते.


Translate »
error: Content is protected !!