ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

18 पगड 12 बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पत्रकार व समाजसेवकांचा सत्कार


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत पत्रकार छायाताई नानगुडे, समाजसेविका परविन पानसरे, पत्रकार हनुमंत वाबळे, समाजसेवक रामदास मेमाणे यांचा सत्कार पार पडला,

सासवड-समाजप्रेरक व पत्रकार सह बहुआयामी व्यक्तिमत्त्व सर्वपरिचित असलेल्या मा.छायाताई नानगुडे, परवीन ताई पानसरे, हनुमंत वाबळे, रामदास मेमाणे, यांना,महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन सन्मान पुरस्कार असे विविध संस्थांमार्फत पुरस्कार प्रदान करण्यात आले.यामुळे सासवड

येथील शाहिद हसन अॅक्टींग अकॅडमी मध्ये ट्रस्टच्या मार्फत सन्मान करण्यात आला.जिद्द,कष्टाळु व प्रामाणिकपणा यामुळे या सर्वांनी अनेक समाजोपयोगी कामे केली.कोणतीही

जातपात न पहाता तळागाळातील लोकांसाठी आजही ते सर्वजण स्वतःची तमा न बाळगता संघर्षमय लढा देत आहेत.कुणाचीही काही समस्या असो, कौटुंबिक समुपदेशन असो त्या सहकार्य करणेस तात्पर्य असतात.वयोवृद्धांसाठी त्या शासकीय विविध योजनांतर्गत लाभ मिळवुन देतात.संवाद

आपला.अशा बहुआयामी सत्कारमुर्तीचा सन्मान करणेसाठी अठरापगड – बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक आप्पासाहेब भांडवलकर,अध्यक्ष मा.महादेवतात्या भोंडे,सचिव अतुलदादा पवार,उपाध्यक्ष राजेंद्रभाऊ धोत्रे,दत्ताशेठ सुर्यवंशी,समीरदादा भिंगारदिवे,राहुलकाका भोंडे, आरपीआयचे पुरंदर तालुका

अध्यक्ष बळीराम सोनवणे ,कोल्हाटी डोंबिवली समाजाचे महाराष्ट्र राज्याचे नेते नानासाहेब ताथवडकर, गणेश दादा भोंडे,आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक मंगेश गायकवाड सर यांनी केले व आभार राजेंद्र भाऊ धोत्रे यांनी मानले.


Translate »
error: Content is protected !!