ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

महामार्ग 965 सत्यपूरम ते मंतरवाडी प्रवास करा आणि हाडे खिळखिळी करून घ्या महामार्गाच्या अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष सत्यपुरम भेकराई, मंतरवाडी येथील नागरिकांचा संताप अनावर


हवेली प्रतिनिधी सह्याद्री माझा

राष्ट्रीय पालखी मार्ग ९६५ पुणे सासवड रोड सत्यपुरम ते मतंर वाडी उरूळी देवाची येथील रोडला पावसामुळे मोठ मोठे खड्डे पडले असून रोडच्या कडेच्या साईट पट्ट्यानां

सुध्दा मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे सतत वाहतुक कोंडी होत असुन खड्यामधे पावसाचे पाणी

साठल्याने रोडचा अंदाज येत नसल्याने खुप मोठ्याप्रमाणात अपघात होत आहेत.तसेच भेकराई नगर येथील ओढ्यावरील संरक्षण कठडे पडले असून मोठी

जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या आदी सुध्दा या ठिकाणी मोठे अपघात झाले

आहेत.पालखी सोहळा दरम्यान आम्ही राष्ट्रीय पालखी महामार्ग दुरूस्ती विभागाला हे काम बर्याच वेळा दाखवून दिले होते तरी सुद्धा या ठिकाणी कायम स्वरूपाची

दुरूस्ती झाली नाही.तातपुरत्या स्वरूपात पुलाच्या कडेला बांबू व पत्रे लावून काम केले होते.तरी तातडीने रोडचे खड्डे बुजवून वड्यावरील संरक्षण कड्याचे

बांधकाम पूर्ण करावे.ही संतप्त ग्रामस्थांची मागणी असुन लवकर काम न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असे येथील स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते

रमेशआप्पा निवंगुणे, नानासाहेब सुर्यवंशी, सोमनाथ यादव, सतिश भाऊ जगताप, बाळासाहेब लोळे, पंढरीनाथ निवंगुणे, राजाभाऊ सुर्यवंशी,उमेश पवार,

सुहास आबा खुटवड, सुर्यकांत गिरी गोसावी, प्रदिप खुटवड, विशाल कामठे,प्रकाश शेवाळे, संतोष

सरोदे,गणेश हरपळे सुनील पवार, नवनाथ पवार यांनी सांगितले.


Translate »
error: Content is protected !!