ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ज्येष्ठ पत्रकार हेमंत ताकवले यांना काकासाहेब पुरंदरे पत्रकारिता पुरस्कार जाहीर.


सह्याद्री माझा:::

जेष्ठ पत्रकार हेमंत ताकवले यांना काकासाहेब पुरंदरे पत्रकारिता पुरस्कार जाहिर.

सासवड (प्रतिनिधी) बापू मुळीक

आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या जेष्ठ पत्रकार, सासवडचे सुपुत्र व आचार्य अत्रे यांच्या समवेत काही काळ काम केलेले चंद्रकांत दत्तात्रय पुरंदरे तथा काकासाहेब पुरंदरे पत्रकार पुरस्कारासाठी सासवड येथील जेष्ठ पत्रकार हेमंत चंद्रकांत ताकवले यांची निवड करण्यात आली आहे.

आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी या पुरस्काराची घोषणा केली. पुरंदरे यांच्या ८५ व्या जयंती निमित्ताने रविवारी २५ मे रोजी सासवड येथील कऱ्हाबाई मंदिरात सायंकाळी पाच वाजता हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार आहे. जेष्ठ वृत्त संपादक श्रीकांत साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे

प्रतिष्ठान व साहित्य परिषद यांच्या वतीने आयोजित या पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून यापूर्वी सासवडचे जेष्ठ पत्रकार सुधीर गुरव, मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार देवराव कदम व सासवड येथील जेष्ठ पत्रकार दत्ता भोंगळे यांना हे पुरस्कार देण्यात आले आहेत. शाल श्रीफळ मानपत्र , स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याचे विजय कोलते यांनी सांगितले

पुरस्कार प्राप्त हेमंत ताकवले हे गेली पंचवीस वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत असुन दैनिक सामना, पुण्यनगरी, नवभारत, जनप्रवास आदी वृत्तपत्रातून त्यांनी काम पाहिले आहे.विविध सामाजिक संघटना, संस्था, प्रतिष्ठान यांच्या वतीने त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दैनिक सामनाचे तालुका प्रतिनिधी म्हणून सध्या ते कार्यरत असून स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे सचिव तसेच सासवडच्या साहित्य परिषदेचे कार्यकारणी सदस्य व सासवड शहर पत्रकार संघाचे खजिनदार म्हणूनही ते काम पाहत आहेत.

प्रतिष्ठानचे व साहित्य परिषदेचे सर्व सदस्यपुरंदरे कुटुंबीय, साहित्य प्रेमी व पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या निमीत्ताने उपस्थित राहणार असून सासवडकर नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानचे सचिव शांताराम पोमण व साहित्य परिषदेचे अध्यक्ष ॲड दिलीप निरगुडे यांनी केले आहे.


Translate »
error: Content is protected !!