महाराष्ट्र

कलमाडी-सोनग्रा-गाडगीळ यांना साहित्य परिषदेच्या वतीने वाहिली श्रद्धांजली


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
कलमाडी–सोनग्रा–गाडगीळ यांना साहित्य परिषदेच्या वतीने वाहिली श्रद्धांजली

पुरंदर प्रतिनिधी- ज्येष्ठ वलयांकित कर्तृत्ववान सामाजिक व राजकीय नेते माजी खासदार सुरेशभाई कलमाडी, ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा तसेच जागतिक कीर्तीचे पर्यावरणप्रेमी माधवराव गाडगीळ यांच्या स्मृतींना सासवड येथे भावपूर्ण वातावरणात आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर व महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित या श्रद्धांजली सभेत शोकाकूल वातावरण होते. या तिन्ही दिवंगत मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या अमूल्य कार्याचा उपस्थित सर्व वक्त्यांनी यावेळी गौरवपूर्ण उल्लेख केला.या प्रसंगी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयराव कोलते, महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष ॲड. दिलीप निरगुडे, कार्याध्यक्ष सतीश पाटील, माजी अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब खाडे, ज्येष्ठ पत्रकार हेमंतराव ताकवले, कुंडलीक मेमाणे, माऊली मेमाणे, बाळासाहेब मुळीक, प्रा. डॉ. जगदीश शेवते, जगदीश शिंदे ,शांताराम कोलते, पत्रकार सुनील लोणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

वक्त्यांनी सुरेशभाई कलमाडी यांच्या राजकीय व सामाजिक योगदानाचा, रतनलाल सोनग्रा यांच्या साहित्यिक कार्याचा तसेच माधवराव गाडगीळ यांच्या पर्यावरण संवर्धनासाठीच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्याचा आढावा घेतला. समाजाच्या विविध क्षेत्रांना दिशा देणारी ही तीन व्यक्तिमत्त्वे आज आपल्यातून निघून गेल्याची खंत सर्वांच्या मनात होती.यावेळी विजयराव कोलते यांनी सुरेशभाई कलमाडी यांच्यासोबतच्या दीर्घकालीन जिव्हाळ्याच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिल्याने वातावरण अधिक भाऊक झाले .

कार्यक्रमाच्या अखेरीस संतोषआबा काकडे यांच्या आवाहनानुसार उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून तिन्ही दिवंगत मान्यवरांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


Translate »
error: Content is protected !!