खंडोबा देवस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे यांच्या हस्ते कऱ्हा नदीमध्ये आलेल्या पाण्याचे खोबरं भंडारा उधळत जलपूजन
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा जवळील कऱ्हा माई नदीमध्ये अखंड प्रतीक्षेनंतर पुरंदर पश्चिम
विभागात दमदार पावसाच्या आगमनाने कऱ्हा नदी दुथडी भरून वाहत असताना जेजुरी पात्रामध्ये पाणी आल्यानंतर
जेजुरी खंडोबा देवस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे यांच्या हस्तेपाण्याचे पूजन करण्यात आले, ओटी भरून खोबरे भंडारा उधळत त्यांनी पाण्याचे पुजन केले,
यावेळी माजी विश्वस्त सुधीर गोडसे, गावकरी मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, भाजपचे मा जेजुरी अध्यक्ष
अशोक खोमणे, शिवसेना अध्यक्ष विठ्ठल सोनवणे,देवस्थानचे मुख्याधिकारी आशिष बाठे,गुरव
समाजाचे अध्यक्ष माधव बारभाई, समीर मोरे,पै कृष्णा कुदळे, काशीनाथ मोरे, छबन कुदळे, सुरेशशेठ उबाळे,गणेश
आगलावे,सुशील राऊत,माऊली खोमणे, याचबरोबर जेजुरी पंचक्रोशी ते अनेक नागरिक उपस्थित होते






