पुरंदर – शिधा पत्रिका ई – केवायसी साठी आणखी 30 जून पर्यंत मुदत वाढ
सासवड प्रतिनिधी सह्याद्री माझा –बापू मुळीक
शिधापत्रिका ई- केवायसी साठी आणखी 30 जून पर्यंत मुदतवाढ
सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक शिधापत्रिका धारकासाठी ई- केवायसी ही बंधनकारक असून, 30 जून पर्यंत ती पूर्ण करावी लागणार आहे. या आधीची मुदत 30 एप्रिल होती, त्यानंतर आता प्रलंबित प्रक्रियेसाठी 30 जून पर्यंत मुदत वाढ ही देण्यात आली आहे. ही केवायसी न करणाऱ्यांची नावे
शिधापत्रिकेवरून, वगळली जातील. आणि त्यांना शासकीय धान्य वितरणातून, वंचित रहावे लागेल, असा स्पष्ट इशारा सरकारने दिला आहे. सध्या तरी पुरंदर तालुक्यात लाभार्थी 1 लाख 74 हजार 616 असून, ही संख्या लाभार्थ्यांच्या 70.87% आहे. केवायसी पूर्ण केलेले
लाभार्थी 1 लाख 23 हजार 742 मात्र अजूनही, 50,873 एवढ्या नागरिकांची प्रक्रिया प्रलंबित आहे, त्यांना येत्या 30 जून पर्यंत ई- केवायसी करणे बंधनकारक असल्याचे, सांगण्यात आले आहे. अन्यथा धान्य बंद करण्याबरोबरच त्यांची नावे वगळण्यात येणार आहेत. राष्ट्रीय अन्य सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांची ओळख पडताळण्यासाठी ही केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालय व केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व रेशन दुकानदाराकडून ही प्रक्रिया सुरू आहे, मात्र प्रलंबित अर्जांची संख्या अधिक असल्याने, यापूर्वीही वेळोवेळी मुदत वाढ ही देण्यात आली आहे.1 लाख 23 हजार 742 जणांची ई- केवायसी पूर्ण तर पुरंदर तालुक्यात एकूण लाभार्थी 1 लाख 74 हजार 616 ही
केवायसी करण्याचे उद्दिष्ट पुरंदर पुरवठा अधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहे की, आजच्या माहितीनुसार 21 मे पर्यंत 50 हजार 873 ग्राहकांचे ई-केवायसी प्रलंबित आहे, ही केवायसी केलेल्यांची संख्या 1 लाख 23 हजार 742 जणांची ई- केवायसी पूर्ण झाले आहेत. तर 50 हजार 873 जणांचे ई-केवायसी राहिले असून ही सवॅ माहिती अर्ज पुरवठा अधिकारी याकडे प्रलंबित असून, लवकरच त्यावर
कार्यवाही होणार असल्याची माहिती पुरंदर तालुका सहाय्यक पुरवठा अधिकारी अश्विनी वायसे यांनी दिली. दरम्यान, ई- केवायसी 30 जून पर्यंत पूर्ण करावी, अन्यथा शिधापत्रिका बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय सूचना केंद्राने’ मेरा केवायसी’ हे मोबाईल ॲप ही विकसित केले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्या पर्यंत या पत्राद्वारे केवायसी पूर्ण करावी. असे गोपाळ ठाकरे, पुरंदर पुरवठा अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.






