न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज जवळार्जुन मध्ये १ मे महाराष्ट्र दिन साजरा
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा नवनाथ राणे —
न्यू इंग्लिश स्कूल जवळार्जुनमध्ये एक मे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा आज दिनांक 1 मे 2025 रोजी जवळार्जुन हायस्कूलमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन करण्यात आले तसेच प्रतिमांचे पूजन करण्यात आले
तसेच पाचवी ते नववीपर्यंत च्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला व निकाल वाटप करण्यात आला प्रथम क्रमांक विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष जवळार्जुन गावचे माजी सरपंच अण्णासाहेब राणे विद्यालयाचे प्राचार्य निगडे सर, बाळासो टेकवडे ,
सुरेश टेकवडे, राहुल टेकवडे ,विष्णू टेकवडे ,सहशिक्षक गायकवाड सर ,कोलते सर ,व सर्व स्टाफ उपस्थित होता विद्यालयाचे प्राचार्य निगडे सर यांचा वाढदिवस ही साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे
अध्यक्ष ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी व पत्रकार नवनाथ राणे यांनी निगडे सरांना शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या ही सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या सर्वांना खाऊचे वाटप करण्यात आले व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला






