ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री संत सोपानदेव पालखी सोहळ्याचे 23 जूनला प्रस्थान


सह्याद्री माझा प्रतिनिधी::

संत सोपान देव पालखी सोहळ्याचे 23 जूनला प्रस्थान

सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक आषाढी वारीसाठी श्री संत सोपान देव महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान, 23 जून रोजी सकाळी 11 वाजता सोपानदेव मंदिरातून होणार आहे, या सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख एडवोकेट त्रिगुण गोपाळ गोसावी यांनी

दिली. संत सोपानदेव मंदिराच्या देऊळ वाड्यातून पालखी प्रस्थान सोहळ्याला 23 जून रोजी सकाळी 11 वाजता प्रारंभ होणार आहे. दुपारचा विसावा पिंपळे, तर पांगाऱ्यातील निषणायी देवी मंदिरात रात्रीचा मुक्काम होईल. 24 जून रोजी यादव वाडीत सकाळचा

विसावा होऊन, परिचेत दुपारचा नैवेद्य तर, मांडकीत रात्रीचा मुक्काम होईल. 26 जूनला पहिले गोल रिंगण, 25 जूनला सकाळचा विसावा जेऊर, पिंपळे खुर्द मधून निरेत दुपारचा नैवेद्य तर बारामतीतील निंबूत विठ्ठल मंदिरात रात्रीचा मुक्काम होईल. 26 जून रोजी निंबूत छपरी, वागळवाडी मध्ये पहिले गोल रिंगण होऊन, सोमेश्वर नगर मध्ये मुक्काम होईल. 27 जूनला करंजे पूल मध्ये सकाळचा विसावा तर

10 फाटा मध्ये दुपारचा नैवेद्य, वडगाव निंबाळकर मध्ये दुपारचा विसावा होऊन, कोराळे बुद्रुक मध्ये मुक्काम होईल. 29 जून रोजी बकरी रिंगण 28 जूनला कठीण पूल मध्ये सकाळचा विसावा तर पणदरेत दुपारचा नै वैद्य, दुपारचा माळेगाव बुद्रुक कोकाटे महाराज वस्तीत विसावा होऊन, बारामती शारदा प्रांगण येथे मुक्काम होईल. 29 जून रोजी सकाळचा विसावा मोतीबाग येथे होऊन, पिंपळी येथे

बकरी रिंगण होईल, भवानीनगर, सणसर, बेलवाडी फाटा दुपारचा विसावा होऊन, लासुरने येथे मुक्काम होईल. 30 जूनला लालपुरी मध्ये सकाळचा विसावा तर निमसाखर दुपारचा विसावा होऊन, निर्वांगी पालखी तळ येथे मुक्काम होईल. 1 जुलै रोजी तरंगेवस्ती रेडणीत सकाळचा विसावा, लाखेवाडीत दुपारचा नैवेद्य ,तर खाराओढा, नीरनिमगाव चौक, बोरावके पेट्रोल पंप येथे दुपारचा विसावा होऊन, अकलूज विठ्ठल मंदिर येथे सोहळा मुक्कामी

पोहोचेल. 2 जुलैला बाबीर पूल ,महाळुंग सकाळचा विसावा, दुपारचा नैवद्य श्री पुरात तर माळखांबीत दुपारचा विसावा होऊन, बोंडले विठ्ठल मंदिरात मुक्काम होईल. 3 जुलैला बंधू बेट सोहळा 3 जुलैला भोंडले मध्ये सकाळचा विसावा, भोंडलेत संत सोपानदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज बंधू भेट सोहळा होईल. आणि भंडीशेगाव पालखीतळमध्ये मुक्काम होईल. 4 जुलै रोजी भंडीशेगावला दुपारचा नैवेद्य, वाखरीत उभे रिंगण आणि पालख्यांच्या भेटींचा सोहळा ,तसेच पालखीचा मुक्काम होईल. 5 जुलैला पालख्यांची वाखरी पादुका जवळ उभे रिंगण व आरती होऊन श्री शेत्र पंढरपूर मध्ये आगमन होईल ,अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख एडवोकेट त्रिगुण गोपाळ गोसावी यांनी दिली.


Translate »
error: Content is protected !!