ताज्या घडामोडीपुणे

जवळाअर्जुनचे वरदान ठरणारे सर्व बंधारे पावसाच्या पाण्याने फुल्ल, सरपंच अजिंक्य अशोकराव टेकवडे यांच्या हस्ते जलपूजन


पुरंदर प्रतिनिधी– सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::

जवळाअर्जुनचे वरदान ठरणारे सर्व बंधारे पावसाच्या पाण्याने फुल्ल, सरपंच अजिंक्य अशोकराव टेकवडे यांच्या हस्ते जलपूजन

पुरंरच्या पुर्व पट्ट्यास व जवळार्जुन गावास वरदान ठरलेले बंधारे पूर्ण क्षमतेने भरुन वाहु लागल्याने सोमवारी जवळार्जुन गावचे युवा सरपंच अजिंक्य अशोकराव टेकवडे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. जवळार्जुनच्या शेतकर्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात महत्त्वाची भूमिका असलेले बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.

जवळेश्वर मंदिरा जवळील बंधारा अनेक वर्षांपासून दुरवस्थेत होता. सरपंच म्हणून काम पाहताना सर्वप्रथम सदर बंधाऱ्याची दुरुस्ती पावसाळ्याआधी यशस्वीरित्या करून घेतल्यामुळे यंदा जवळार्जुन दुष्काळमुक्त राहील असा विश्वास सरपंच अजिंक्य टेकवडे यांनी व्यक्त केला. सरपंच व उपसरपंच यांनी अतिशय काटेकोरपणाने गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे व नियोजनबद्ध कामामुळे सर्व शेतकरी व तरुण वर्ग आनंदमय असल्याचा दावा तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी आप्पासाहेब राणे यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी उपस्थित सरपंच अजिंक्य टेकवडे, उपसरपंच प्रतिभा राणे, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी राणे, डायरेक्टर महेश राणे, पोलीस अधिकारी निलेश राणे, माजी सरपंच नागेश टेकवडे, सोमनाथ राणे, शेखर टेकवडे, जीवन टेकवडे, ग्रामसेविका रूपाली लोणकर, शिपाई दिलीप पोटे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.


Translate »
error: Content is protected !!