वीर या ठिकाणी पीएम आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षण सुरू
सह्याद्री माझा प्रतिनिधी::
वीर या ठिकाणी पीएम आवास च्या दुसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षण सुरू
सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक वीर( ता. पुरंदर) येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे, गावातील बेघर, कच्चे मातीचे घर असणाऱ्या कुटुंबांना हक्काचा निवारा उपलब्ध करून, देण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधान
मंत्री आवास योजना, वीर येथे नियोजनबद्ध राबवण्यात येत आहे, यानुसार गावातील बेघर तसेच कच्ची घरे असणाऱ्या कुटुंबाचे आवास प्लस या मोबाईल ॲप द्वारे घरोघरी जाऊन, सरपंच मंजुषा संतोष धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली, ग्रामपंचायत कर्मचारी सर्वेक्षण करत आहेत, गावातील प्रत्येक बेघर कुटुंबाच्या घरी जाऊन,
त्यांच्या कुटुंबातील सदस्य संख्या, त्यांची वैवाहिक स्थिती, शिक्षण, वय, व्यवसाय, गंभीर आजार इत्यादी बाबत तसेच घर असेल तर ते पक्के आहे की कच्चे, भिंती कशा आहेत, घरात शौचालय आहे का नाही घराला छत कसे आहे, कुटुंबातील तीन/चार चाकी वाहन आहे का? कुटुंबातील कोणी व्यक्ती आयकर भरत आहे का? किसान क्रेडिट कार्ड आहे का?यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या आवास योजनेचा लाभ
घेतला आहे का ?घरकुल बांधकामासाठी जागा आहे का? यासारखे प्रश्न विचारून सर्वेक्षण करण्यात येत आहे, यानंतर सध्याच्या घराचा व ज्या ठिकाणी घर बांधणार आहे, त्या जागेचा फोटो अपलोड करण्यात येत आहे, या सर्व बाबीसाठी आधार कार्ड ,अनिवार्य करण्यात आले आहे, वीर गावातील कोणीही पात्र लाभार्थी बेघर राहू नये, यासाठी
ग्रामपंचायती मार्फत, समाज माध्यम, तसेच दवंडी देऊन, प्रचार प्रसिद्धी करण्यात आली आहे. वीर गावातील प्रत्येक समाज घटकाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून, देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहणार आहोत, सर्वांच्या सहकार्याने गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, शासन पातळीवरील प्रत्येक योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणार आहोत, असे सरपंच मंजुषा धुमाळ यांनी सांगितले आहे.






