ताज्या घडामोडीराजकीय

पिसर्वे गावचे बाळासाहेब कोलते आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा;;

पिसर्वे गावचे बाळासाहेब कोलते आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

बाळासाहेब कोलते आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित.
सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या पिसर्वे गावचे माजी सरपंच बाळासो जयसिंग कोलते यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला.टॅलेंट कट्टा व नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदर्श सरपंच हा पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार वितरण समारंभ पुणे येथे पार पडला.यावेळी कोरोना काळात गावातच कोविड सेंटर सुरू करून अनेक रुग्णांना गावातच उपचार उपलब्ध करुन दिले. गावातील विकास कामांना गती देत पिसर्वे गावचा विकास करता आला. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून पिसर्वे परिसरातील ओढे खोलीकरण करून,

गाव जलयुक्त करण्यासाठी काम केले. दरवर्षी पाऊस पडल्यानंतर पावसाचे पाणी वाहून न जाता साठवले जाते. त्या पाण्यामुळे शेतातील विहिरी, बोअरवेलला बारा महिने पाणी असते. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो असे प्रतिपादन सत्कारमूर्ती आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त बाळासो जयसिंग कोलते यांनी केले.

यावेळी सरपंच रविंद्र कोलते, उपसरपंच महेश वाघमारे, ऍडव्होकेट शिवाजी कोलते,माजी उपसरपंच गणेश कोलते, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत कोलते,निवृत्त पोलीस अधिकारी मनोहर कोलते, स्कूल कमिटी चेअरमन अरुण कोलते, माजी खजिनदार सदाशिव कोलते,उद्योजक गणेश कोलते,सामाजिक कार्यकर्ते संभाजी कोलते,नवनाथ कटके, संतोष पवार, विजय कोलते, जालिंदर कोलते,विठ्ठल कोलते,सोसायटीचे उपाध्यक्ष संतोष कोलते,नितीन वायकर,महेंद्र कोलते, गणेश यादव, जालिंदर कोलते,नवनाथ कोलते, दत्ता कोलते,सोपान वायकर, साईराज कोलते आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


Translate »
error: Content is protected !!