गुंजवणी प्रकल्प लवकरच पूर्णत्वाच्या दिशेने जाणार, फुरसुंगी उरुळी देवाची नगरपालिका, पुरंदर मधील गायरान जमिनीवर आयटी पार्क होणार, माजी मंत्री विजय शिवतारे
वाल्हे, वाड्या वस्त्यांच्या समावेशासह *गुंजवणी प्रकल्प मार्गी लागणार*
महाधिवक्त्याचा अभिप्राय घेऊन निघणार फुरसुंगी उरुळी पालिकेची अंतिम अधिसूचना
पुरंदर हवेली मतदारसंघातील विविध प्रश्नांवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. माजी मंत्री विजय शिवतारे
यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पुरंदर हवेलीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यानुसार आज ही उच्चस्तरीय बैठक
पार पडली. यावेळी गुंजवणी, फुरसुंगी उरुळी देवाची नगरपालिका, समाविष्ट गावांचा कर, पुरंदर आयटी पार्क, पुरंदर उपसा योजना अशा विविध विषयांवर महत्त्वपूर्ण
निर्णय घेण्यात आल्याची माहिती माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्रालयातील या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, नगरविकास, जलसंपदा आणि
उद्योग विभागाचे प्रधान सचिव, महिला आघाडीच्या डॉ. ममता लांडे-शिवतारे, सेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप यादव, तालुकाप्रमुख हरिभाऊ लोळे, पुरंदरचे माजी सभापती अतुल
म्हस्के, पंचायत समिती सदस्य राजीव भाडळे, माजी जि.प सदस्या स्वाती टकले, मच्छिंद्र दगडे, बाळासाहेब राऊत, दिलीप भाडळे, रमेश भाडळे, कपिल भाडळे, राहुल यादव,
प्रदीप चव्हाण, सागर भुजबळ, शंकर भाडळे, ज्ञानेश्वर कामठे, आण्णा महानवर, सोमनाथ रणनवरे, रत्नाकर रणनवरे, राहुल रणनवरे, विशाल पवार, अमित गुरव, गणेश
कामठे, निलेश पवार, अक्षय पवार, कैलास शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आल्याचे शिवतारे म्हणाले.
*जलसंपदा विभाग* –
१) पुरंदर तालुक्यातील वाल्हे व राख परिसरातील वाड्या वस्त्या यांचा समावेश असलेले जलवाहिनीचे मुळ आरेखन जलसंपदा विभागाने तांत्रिक मान्यतेसाठी २८ जुलै पर्यंत राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठवावे.
२) तसेच भोर वेल्हा येथील वांगणी, वाजेघर व शिवगंगा खोऱ्यातील प्रस्तावित उपसा सिंचन योजनांना राज्य तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता मिळताच गुंजवणी प्रकल्पाच्या १७८२ कोटी रुपयांच्या सुधारित प्रस्तावाला कॅबिनेट मान्यता देईल.
३) वीर धरणातून विसर्ग होऊन नीरा नदी पात्राद्वारे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पुरंदर तालुक्यातील राजुरी, रीसे, पिसे, नायगाव, पांडेश्वर, रोमनवाडी, मावडी, पिंपरी तसेच बारामतीच्या जिरायत भागातील २९ गावांना देण्यासाठी प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश.
४) पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पंप व अन्य दुरुस्तीची कामे करण्यासाठी मंजूर ५६ कोटींची कामे निविदा काढून तत्काळ मार्गी लावावीत.
५) जांभूळवाडी तलावाचे विकसन जलसंपदा विभागाने करावे, त्यासाठी लागणारा निधी तळे संवर्धन योजनेतून देणार.
*नगरविकास विभाग -*
१) फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद स्थापन करण्यासाठी राज्याचे महाधिवक्ता यांचा अभिप्राय घेऊन तत्काळ अंतिम अधिसूचना काढण्यात येईल.
२) फुरसुंगी उरुळी देवाची पाणीपुरवठा योजनेत वंचित राहिलेल्या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक ९३ कोटींचा निधी नगरोत्थान योजनेतून मनपाला देणार.
३) मनपात समाविष्ट उंड्री, पिसोळी, गुजर निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, कोळेवाडी, वडाचीवाडी, हांडेवाडी, होलकरवाडी, जांभूळवाडी व इतर गावांना पाणीपुरवठा व संडपनियासाठी तात्पुरत्या व दीर्घकालीन उपाययोजना मनापणे नगरविकास विभागाकडे प्रस्तावित कराव्यात.
४) समाविष्ट गावात ग्रामपंचायत कराच्या दुपटीपेक्षा जास्त कर आकारणी करण्यात येऊ असे आदेश पुणे मनपाला देण्यात आले.
*उद्योग विभाग*
१) मौजे. दिवे, चांबळी व कोडीत तालुका. पुरंदर येथील गायरान जमिनीत आयटी पार्क उभारण्यासाठी एमआयडीसीने महसूल विभागाला जागा मागणी प्रस्ताव सादर करावा. उद्योग विभागाने हस्तांतरण नंतर पुढील कार्यवाही तातडीने करावी.
२) पुरंदर तालुक्यातील मावडी क. प येथील संपादित जमीन वगळण्याची अधिसूचना तातडीने काढण्याचे आदेश.






