ताज्या घडामोडीपुणे

माहूर धरण (लघु पाटबंधारे प्रकल्प) आणि रेणुका माता/माहूरजाई वॉटर फॉल पर्यटन स्थळ विकसित व्हावा


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::-

माहूर धरण (लघु पाटबंधारे प्रकल्प) आणि रेणुका माता/माहूरजाई वॉटर फॉल पर्यटन स्थळ विकसित व्हावा

*माहूर धरण (लघुपाटबंधारे प्रकल्प)आणि रेणुका माता/माहूरजाई वॉटर फॉल बाबत*

माहूर तालुका पुरंदर,जिल्हा पुणे येथील सदर प्रकल्प हा पुरंदर तालुक्यामधील सर्वप्रथम व हमखास पूर्णपणे भरणारा प्रकल्प आहे.

धरणाचा परिसर निसर्गरम्य असून वर्ष विहार,नौकानयन, उंच धबधबा,उत्तम किनारा अशा अनेक गोष्टी अनुकूल आहेत.

सदर प्रकल्प/धरण १९७७ साली पूर्ण झाला आहे.

धरणाची लांबी_ २७५ मीटर.

धरणाची महत्तम उंची_२३ मीटर.

माथ्याची रुंदी_ ३मीटर.

सदर प्रकल्पाच्या खालच्या बाजूस कुशीत रेणुका माता/माहूरजाई माता मंदिर वसले आहे.

सदर प्रकल्पावर सुमारे ७५ ते ८० फूट उंचीवरून पडणारे २ वॉटर फॉल आहेत.

३ ते ४ टप्प्या टप्प्याने वॉटर फॉल वरून पाणी जलद प्रवाहने वाहते हे दृश्य पर्यटकांसाठी हृदयस्पर्शी आनंददायी असते याची प्रचिती असंख्य पर्यटकांना आली आहे.

पुरंदर किल्ल्यापासूनचे सर्व पावसाचे पाणी या प्रकल्पातून वाहते व पुढे ते वीरधरणाला जाऊन मिळते.

पुरंदर किल्ल्यापासून वेगाने येणारे सर्व पाणी या समतल असणाऱ्या धरणातून पुढे पुन्हा अतिशय वेगाने वीर धरणाकडे वाहते याचा पर्यटक आनंद घेतात.

सदर वॉटर फॉल कडे आणि रेणुका माता/माहूरजाई माता मंदिराकडे जाण्यासाठी दोन्ही बाजूने सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम केले असून उर्वरित काम करण्याचे नियोजित केले आहे.

प्राचीन असणाऱ्या या रेणुका माता/माहूरजाई मंदिरामुळे सदर प्रकल्पाचे देखील सौंदर्य खुलून दिसते.

‘ मे ‘ महिन्यामध्ये दरवर्षी वनभोजनाचा कार्यक्रम सदर परिसरामध्ये मोठ्या उत्साहात पालखी तसेच रितीरिवाजाप्रमाणे साजरा केला जातो.

आरती नंतर कितीही दुष्काळग्रस्त परिस्थिती असली तरी थोडाफार का होईना पाऊस पडतोच अशी जागृत रेणुका माता/ माहूरजाई देवी येथे आहे.

रेणुका माता/माहूरजाई देवीची मूर्ती पूर्ण रूपामध्ये आहे.

घटस्थापनेचा कार्यक्रम देखील नऊ दिवस मोठ्या दिमाखात येथे साजरा केला जातो.

विविध ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त येऊन येथे भजनाचा कार्यक्रम देखील उत्साहात पार पाडला जातो.

सदर ठिकाणी धान्य भाजीपाला इत्यादी वस्तू उपलब्ध आहेत.

यावर्षी या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी चहापाणी,नाश्ता जेवणाची उत्तम सोय/नियोजन करण्यात आले आहे.

पर्यटन स्थळाच्या दोन्ही बाजूने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

*निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आमराई हॉटेल*
श्री.नवनाथ दिनकर जगताप यांनी पर्यटकांसाठी सुसज्ज ठेवले आहे. (संपर्क ८६०५९९९६८८ यावर संपर्क करून आपण ऑर्डर देऊ शकता. प्री ऑर्डर देखील संपर्क करून घेतल्या जातील)

वन डे ट्रिप चे देखील उत्कृष्ट नियोजन यांनी केले आहे.
(शासकीय,राजकीय,खाजगी,व्यावसायिक, इंग्लिश मीडियम स्कूल सहली तसेच इतर क्षेत्रातील असंख्य पर्यटक दरवर्षी यांच्याकडे वन डे ट्रिप आनंद घेण्यासाठी साठी येतात.)

माहूर धरण आणि माहूरजाई/रेणुका माता वॉटर फॉल हा

१)पुण्यापासून ६५ किमी अंतरावर.

२)वीर धरणापासून १२ किमी अंतरावर.

३)ऐतिहासिक पुरंदर किल्ल्या पासून १५ किमी अंतरावर.

४) केतकावळे येथील बालाजी मंदिरापासू १६ किमी अंतरावर.

५) श्री.क्षेत्र.बनेश्वर मंदिर आणि वॉटर फॉल पासून २२ किमी अंतरावर.

६) महाराष्ट्राचे आराध्य दैवत जेजुरीच्या खंडे रायापासून १५ किमी अंतरावर.

७) सासवड येथे पवित्र कऱ्हा नदीपासून २३ किमी अंतरावर.

८) श्री.क्षेत्र म्हस्कोबा वीर पासून ९ किमी अंतरावर.

९) श्री.क्षेत्र नारायणपूर दत्त मंदिरापासून २८ किमी अंतरावर.

१०) श्री.क्षेत्र कोंडीत म्हस्कोबा मंदिरापासून ३० किमी अंतरावर.

११)अष्टविनायक श्री.क्षेत्र मोरगाव पासून ३८ किमी अंतरावर.

१२)छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ३० किमी अंतरावर.

१३) श्री.क्षेत्र भुलेश्वर मंदिरापासून ३५ किमी अंतरावर.

१४) श्री.क्षेत्र.हरनी महादेव मंदिरापासून ८ किमी अंतरावर.

१५) भाडगर धरण आणि वॉटर फॉल पासून २५ किमी अंतरावर.

१६) श्री.क्षेत्र.मांढर देवी पासून ३ किमी अंतरावर.

१७)श्री.क्षेत्र मांढरदेवी (मांढरगड) ४५ किमी अंतरावर.

पर्यटकांनी पर्यटन स्थळाचा आनंद घेण्यासाठी यावे ही सर्वांना विनंती.

या ठिकाणी पर्यटन स्थळ विकसित झाल्यास रोजगाराची संधी या गावातील तरुणांना मिळू शकते.

माहूर येथील सर्व ग्रामस्थ माहूर ग्रामपंचायत सरपंच व त्याचे सदस्य माहूर वि. का. सह. सोसायटी चे चेयरमन व त्याचे सर्व सदस्य माहूरजाई पाणी वापर संस्थेचे चेअरमन व सर्व सदस्य गावातील सर्व माजी पदाधिकारी यांना कळविण्यात आनंद होतो की आज बुधवार दि.28 मे 2025 रोजी दुपारी 4 वाजता माहूर धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले. माहूर धरण बांधल्यानंतर पहिल्यांदाच माहूर धरण पूर्ण क्षमतेने भरून उसांडून वाहू लागले. त्यासाठी गुरुवार दि. 29/5/2025रोजी सकाळी 9 :30 माहूर धरणावर जल पूजनाचा माहूर ग्रामस्थ व माहूरजाई पाणी वापर संस्था यांचे वतीने ठेवण्यात आलेला आहे सर्व ग्रामस्थांनी व सभासदांनी ही नम्र विनंती.

माहूरजाई पाणी वापर संस्था.


Translate »
error: Content is protected !!