पुणेब्रेकिंग न्यूज

रिसेपिसे ते राजुरी प्रवास चिखलामुळे अवघड झालेला; ग्रामस्थांची त्वरित मुरूम टाकण्याची मागणी


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा, —

रिसेपिसे ते राजुरी प्रवास चिखलामुळे अवघड झालेला; त्यासाठी त्वरित मुरूम टाकण्याची मागणी वाढली

सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक सासवड सुपा या राज्य मार्गाच्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे, त्यामुळे रिसेपिसे ते राजुरी या दोन गावाच्या दरम्यान, असलेल्या रस्त्यावर चिखल झाला आहे, त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांना खूप अडचणीतून जावे लागत आहे. अनेक दिवसापासून सासवड सुपा या मार्गाचे सासवड पासून

पिसे गावापर्यंतची अवस्था अत्यंत वाईट असल्याने, चांगल्या पद्धतीचे काम करण्याची सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांची मागणी आहे, सध्या तरी या रस्त्याची रुंदीकरण होऊन, काँक्रीटचा रस्ता होत आहे. या मार्गावरील रिसेपिसे ते राजुरी या दोन गावांमधील पाच

किलोमीटरचे अंतर असताना, रस्ते कामासाठी खोदाई करण्यात आली आहे. तसेच रुंदीकरण करूनही त्यावर रोलिंग करण्यात आलेले आहे. पावसाळ्यापूर्वीच त्यावर मुरमीकरण करणे गरजेचे होते, मात्र या संबंधित काम करणाऱ्या यंत्रणेने या रस्त्यावर बाजूच्या चारीत माती मिश्रित, मुरूम टाकलेला आहे. यामुळे मागील आठवड्यापासून या परिसरामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे, रस्त्यावर चांगलाच चिखल

जमा झालेला आहे. अनेक मोठी वाहणे या ठिकाणी या चिखला मधूनच रुतून बसत आहेत, तर दुचाकी चालकांना या चिखलातून मार्ग काढायचा कसा? असा प्रश्न पडत आहे, अनेक दुचाकी चालक या चिखलामध्ये घसरून पडत आहेत. याच मार्गावरून जेजुरी तसेच मोरगाव या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांची येजा सुरू असते.

यामुळे या रस्त्यावर तातडीने मुरूम टाकला पाहिजे, वाहतुकीसाठी योग्य रस्ता करणे हे महत्त्वाचे आहे, व गरजेची ही आहे. याकडे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांमध्ये नियंत्रण असणाऱ्या, अधिकारी वर्गावर पावसाळ्यामध्ये विचार घेऊन, तातडीने काम करणे गरजेचे होते. परंतु या मार्गाने नियमित येजा करणाऱ्या लोकांना यामुळे खूप त्रास होत आहे. पुढील महिन्यापासून शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची तर खूप अडचण होणार आहे.

यामुळे तातडीने हा रस्ता वाहतुकीसाठी करणे योग्य आहे. भाजीपाला सुद्धा सासवडला नेताना खूप अडचणी येत आहेत. विश्वास आंबुले, माजी सरपंच, रिसे (ता. पुरंदर)रिसेपिसे परिसरातील, सर्व नागरिकांचे सुपा बाजारपेठेमध्ये गावाला नियमित व्यवहार सुरू आहेत, सध्या तरी त्या ठिकाणी असलेल्या चिखलामुळे सुपा येथे जाण्यासाठी खूप अडचणी येत आहेत, चिखलातून मार्ग काढताना खूप शेतकरी

वर्गाला त्रास होत आहे. याची दखल या ठिकाणी कंपनी घेत नाही, मुरमीकरण करणे खूप गरजेचे होते, परंतु ते केले जात नाही, हीच दुर्लक्षित बाब त्या कंपनीला अडचणीत आणणारी आहे. शांताराम मुळीक, माजी उपसरपंच, पिसे (ता. पुरंदर)


Translate »
error: Content is protected !!