पुणे

झेंडेवाडी – श्रीनाथ म्हस्कोबा महाराज मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन बाबाराजे जाधवराव यांच्या हस्ते संपन्न


सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::

*श्रीनाथ म्हस्कोबा महाराज मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन बाबाराजे जाधवराव यांच्या हस्ते संपन्न*

सासवड पतिनिधी: झेंडेवाडी (ता. पुरंदर) : येथील श्रीनाथ म्हस्कोबा महाराज मंदिराच्या नव्याने बांधण्यात येणाऱ्या भव्य सभामंडपाचे भूमिपूजन शुक्रवार, दिनांक २८ जून २०२५ रोजी थाटात पार पडले.

या भूमिपूजन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे पुरंदर विधानसभा निवडणूक प्रमुख बाबाराजे जाधवराव यांनी उपस्थित राहून मंडपाचे विधिवत भूमीपूजन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. बाबाराजे जाधवराव होते. यावेळी शरद झेंडे,सोनाली झेंडे,अमर झेंडे, समीर झेंडे, अजित गोळे, अनिल झेंडे, विकास झेंडे, विठ्ठल झेंडे, सारिका झेंडे, दत्तात्रय झेंडे, अविनाश झेंडे,दिनेश झेंडे,नवनाथ झेंडे, दिलीप झेंडे,रमेश झेंडे,रामदास झेंडे,दादा झेंडे, प्रकाश झेंडे, संतोष झेंडे, विलास झेंडे, गोपीनाथ झेंडे, मयूर झेंडे, तानाजी पवार,विविध मान्यवर, ग्रामस्थ, महिला,युवक, तसेच नाथभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी बाबाराजे जाधवराव यांनी आपल्या मनोगतातून मंदिर विकासासाठी आवश्यक असलेल्या पुढील योजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “सभामंडप ही केवळ एक वास्तू नसून, गावातील एकात्मता, श्रद्धा आणि परंपरेचे प्रतीक आहे.”त्यासाठी गावातील दानशूर व्यक्तींनी सडळ हाताने मदत करावी असेही सांगितले


Translate »
error: Content is protected !!