ताज्या घडामोडीपुणे

उपविभागीय कार्यालय पुरंदर व तहसील कार्यालयात ९ जूनला लोक अदालत


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा::

उपविभागीय कार्यालय पुरंदर व तहसील कार्यालयात 9 जूनला लोक अदालत

सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक उपविभागीय अधिकारी कार्यालय पुरंदर व तहसील कार्यालयामध्ये सोमवार दि. 9 जून रोजी महसूल लोक अदालत आयोजित केली आहे, महसूल न्याय प्रक्रियेतील प्रलंबित दाव्यांना सामंजस्याने आणि तडजोडीतून न्याय मिळवून देण्यासाठी, लोक अदालत पार पडणार असल्याची, माहिती

उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे व तहसीलदार विक्रम राजपूत यांनी ही माहिती दिली. महसूल विभागात, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे दावे अनेकदा वर्षानुवर्ष, प्रलंबित राहतात, न्याय मिळवण्यासाठी नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो, मात्र या लोक अदालतीत दोन्ही पक्षकारांचे एकमत झाल्यास, तडजोडीतून दावे निकाली काढले जाणार आहे,

ही महसूल लोक अदालत उपविभागीय अधिकारी कार्यालय पुरंदर व तहसील कार्यालय पुरंदर येथे सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील,यासाठी सर्व तडजोड होऊ शकेल, अशा दाव्यातील पक्षकारांनी प्रकरण, लोक अदालतीत मांडून मार्ग काढावा असे, आवाहन उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे व तहसीलदार विक्रम राजपूत यांनी केले आहे.


Translate »
error: Content is protected !!