स्व शिवाजीआप्पा पोमण यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त आदर्श कार्यकर्ता पुरस्कार जाहीर ;
सह्याद्री माझा ****
स्व शिवाजीआप्पा पोमण यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त आदर्श कार्यकर्ता पुरस्कार जाहीर; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा सासवड
प्रतिनिधी: बापू मुळीक वसंत दादा पाटील प्रतिष्ठान कोंढवा बुद्रुक पुणे यांच्या वतीने यावर्षी आदर्श सरपंच पुरस्कार सोमुर्डीच्या विद्यमान सरपंच मंदा शांताराम शेंडकर आणि राजुरी चे माजी सरपंच उद्धव भगत यांना तर ‘आदर्श कार्यकर्ता’ पुरस्काराचे भिवरीचे माजी सरपंच दिलीप कटके यांना सन्मानित केले
जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी दिली. पुरस्काराचे स्वरूप हे शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, आणि रोख रुपये 11 हजार रुपये असे असणार आहे. सासवड (ता. पुरंदर) मोहिनी हॉटेल येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले स्वर्गवासी शिवाजीराव पोमण
यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम होत आहे. ‘आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’ आणि ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ वितरण सोहळा शनिवारी दि. 24 दुपारी दोन वाजता हिवरे (ता. पुरंदर) येथील गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. यावेळी आमदार विजय शिवतारे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या प्रमुख उपस्थिती असेल, या सोहळ्यास
पुरंदर आणि हवेलीतील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे, आवाहन वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कामठे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये जालिंदर (भाऊ) कामठे, भानूदास (काका) जगताप, संतोष जगताप, सचिन पठारे, शिवाजी साळुंखे, इतर पदाधिकारी व पत्रकार आदी उपस्थित होते. आभार प्रदर्शन संतोष जगताप यांनी मानले.






