निधन वार्ता – जवळार्जुन येथील लक्ष्मणराव उर्फ बाळासो केशवराव पवार यांचं वृद्धापकाळाने निधन
निधन वार्ता – लक्ष्मणराव पवार यांचे निधन.
सासवड ( प्रतिनिधी ) सह्याद्री माझा
पुरंदर तालुक्यातील जवळार्जून येथील लक्ष्मणराव उर्फ बाळासो केशवराव पवार (वाल्हेकर ) वय ८२ यांचे वृद्धापकाळने नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी, एक
मुलगा, तीन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
पुरंदर तालुका वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दिंडी क्र.१८४ प्रमुख हभप मोहन महाराज पवार (वाल्हेकर), जवळार्जून
ग्रामपंचायत सदस्या संगीता भिमराव टेकवडे यांचे वडील, आरोही टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक कैलास पवार यांचे आजोबा तर प्रगतशील बागायतदार सुरेश टेकवडे आणि चंद्रकांत टेकवडे यांचे मेहुणे होते.






