पुणे

माळशिरस आरोग्य केंद्रात आषाढी एकादशीनिमित्त आरोग्य दिंडी


मुख्य संपादक हनुमंत वाबळे::

माळशिरस आरोग्य केंद्रात आरोग्य दिंडी

प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस (ता.पुरंदर) येथे साथीरोग प्रादुर्भाव नियंत्रण करण्यासाठी राबवली आरोग्याची वारी दिंडी.पुरंदर तालुक्यामध्ये आरोग्य विभागामार्फत आरोग्य दिंडी आयोजित केली होती. शुक्रवार (दि.४) रोजी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

आरोग्य दिंडीमध्ये आरोग्य विषय जनजागृती आणि साथीच्या आजाराविषयी लोक जागृती करण्यात आली.यामध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया तसेच पाण्यापासुन होणारे आजार यांची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

तालुका आरोग्य अधिकारी विक्रम काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र मालशिरसचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभंकर देशमुख,वैद्यकीय अधिकारी प्रियांका साळुंखे,आरोग्य सेवक सुनील कदम, तसेच सर्व आरोग्य सेवक व सेविका,आशा सेविका आणि आरोग्य कर्मचारी,सर्व समुदाय आरोग्य अधिकारी उपस्थित होते.


Translate »
error: Content is protected !!