मांढरगावच्या सरपंचपदी सौ शिल्पा दत्तात्रय शिर्के तर उपसरपंच पदी मंगेश जगताप यांची बिनविरोध निवड
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::;
मांढरगावच्या सरपंच पदी शिल्पा शिर्के तर उपसरपंचपदी मंगेश जगताप यांची बिनविरोध निवड
सासवड प्रतिनिधी: हनुमंत वाबळे मांढर (ता. पुरंदर )येथील ग्रामपंचायतच्या सरपंच वनिता पापळ व उपसरपंच किरण काशीद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे, रिक्त झालेल्या पदासाठी
निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एक -एक अर्ज आल्याने, सरपंच शिल्पा दत्तात्रेय शिर्के व उपसरपंच मंगेश प्रल्हाद जगताप यांची बिनविरोध निवड झाल्याची,
घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी (मंडलाधिकारी) रूपाली सरतापे यांनी सरपंच ,उपसरपंच पदाची निवड जाहीर केली. तर निवडणूक सहाय्यक म्हणून तलाठी मेघा गवळी, ग्रामसेवक शशांक सावंत यांनीही
काम पाहिले. यावेळी सदस्या वनिता पापळ, ज्योती खोमणे ,वर्षा शिर्के, वंदना शिर्के, किरण काशीद ,कावेरी सुकल ,पुनम गाडे आदी उपस्थित होते .माजी आमदार संजय जगताप ,तालुका अध्यक्ष प्रदीप पोमण ,मुन्ना शिंदे, यांच्या हस्ते सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार
करण्यात आला. याप्रसंगी तानाजी बी शिर्के, महादेव एम के शिर्के ,संतोष व्यंकट शिर्के, नवनाथ शिर्के ,चंद्रकांत शिर्के ,सोपान पापळ, हनुमंत शिर्के, दिपक पापळ, दिलीप पापळ,धनु निरगुडे स्वीय सहाय्यक, संतोष बा शिर्के, दत्तात्रेय शिर्के ,हेमंत गुरव गावातील आजी -माजी सरपंच, उपसरपंच ,सदस्य ,विविध कार्यकारी
सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य ,महिला वर्ग लक्षणीय होती. शेतकरी ,युवक वर्ग ,ज्येष्ठ मंडळी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. गावातील पदाधिकारी सर्वांना सहमतीत घेऊन, गावच्या सर्वांगीण
विकासासाठी शासनाच्या असणाऱ्या सोयी सुविधा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्य महिला, शेतकरी ,कष्टकरी यांच्यासाठी माझ्या पदाचा पूर्णपणे, कार्यकाल गावच्या विकासासाठीच काम करणार असल्याचे नूतन सरपंच शिल्पा शिर्के यांनी सांगितले.






