पुणे

सिंहगड रोड क्षत्रिय कार्यालय हद्दीतील अनधिकृत बांधकाम, टपऱ्या कच्चे बांधकाम त्यावर नगरपालिकेची कारवाई


पुणे शहर प्रतिनिधी ज्ञानेश्वर अण्णा दळवी:;

दि.३०/०६/२०२५ (पुणे प्रतिनिधी)

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील
सिंहगड रोड येथील रस्ता पदपथ,इमारत फ्रंट व साईड मार्जिनमधील अनधिकृत कच्चे पक्के बांधकाम निर्मूलनाची कारवाई करण्यात आली.बांधकाम विकास विभाग झोन क्र. ०३ व अतिक्रमण विभागाच्या वतीने संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली.

दि.३०/०६/२०२५ रोजी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सिंहगड रोड येथील वारंवार येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारीमुळे व वाहतूक कोंडीमुळे अतिक्रमण निर्मूलन कारवाई बांधकाम विकास विभाग व अतिक्रमण निर्मूलन विभाग यांचे मार्फत संयुक्त कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई उप आयुक्त अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुल विभाग श्री.संदीप खलाटे व उप आयुक्त परिमंडळ क्र.३ श्री.विजयकुमार थोरात यांचे नियंत्रणाखाली तसेच महापालिका सहाय्यक आयुक्त सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय श्रीमती. प्रज्ञा पोतदार यांचे उपस्थितीत सदर कारवाई करण्यात आली.

सदर कारवाईस क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक श्री.संजय जाधव,अतिक्रमण निरीक्षक श्रीमती मेघा राऊत ,कनिष्ठ अभियंता श्री. खाडे व श्री शिंदे ,तसेच सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक श्री.प्रशांत कोळेकर, श्री.विनोद दुधे , श्रीमती आकांक्षा खोडे ,श्री.अविष्कार दवणे, श्री. योगेश कोत्तावड, श्री.हनमंत काटकर उपस्थित होते तसेच ०२ पोलीस व १० महाराष्ट्र सुरक्षा बल व ३० बिगारी सेवक इ. स्टाफ हजर होता.

सदर कारवाई मध्ये २००० स्के.फूट कच्चे/पक्के बांधकाम मोकळे केले.तसेच हातगाडी-०३, काऊंटर- ०७
इतर- १२ , शेड / झोपड्या-०८ जवळपास ०३ ट्रक साहित्य जप्त केले
सदरची कारवाई यापुढे देखील मोठ्या प्रमाणात चालूच राहणार आहे.


Translate »
error: Content is protected !!